भोर - सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.कारखान्याच्या २८ व्या सर्वसाधारण सभेत थोपटे बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, विकास कोंडे, के. डी. सोनवणे, शैलेश सोनवणे, दिलीप बाठे, विठ्ठल आवाळे, धनंजय वाडकर, शोभा जाधव, सीमा सोनवणे, दिनकर धरपाळे, उत्तम थोपटे, रोहन बाठे, निर्मला आवारे, सुमंत शेटे, अमीत सांगळे, उध्दव दिवेकर व सभासद कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे संचालक शैलेश सोनवणे यांनी केले, तर कार्यकारी संचालक उध्दव दिवेकर यांनी सभेच्या पत्रिकेवरील ठरावाचे वाचन केले. त्या वेळी सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्माला आवारे व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन राजेंद्र शेटे यांनी केले.भोर, वेल्हे तालुक्यातील उपसा योजनांची कामे पूर्ण झाल्याशिवाय, तसेच गुंजवणी धरणाच्या जाचक अटी रद्द करुन संपूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणातील पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ दिला जाणार नाही. असा इशारा थोपटे यांनी जलसंपदा विभागाला दिला.
शासनाच्या धोरणांमुळे साखर व्यवसाय अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 1:06 AM