हर्षवर्धन पाटील : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा
कळस: केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण वीस टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य दोन वर्षांनी कमी केले आहे. केंद्राच्या या धोरणात्मक निर्णयामुळे साखर कारखान्यांना नजीकच्या काळात मोठा फायदा होणार आहे अशी माहिती राज्याचे माजीमंत्री तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारखान्याच्या सभागृहामध्ये शनिवार (दि २५) रोजी पार पडली. यावेळी पाटील यांनी सभासदांशी संवाद साधताना ही माहिती दिली. सभेच्या सुरुवातीला कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केंद्राच्या आधीच्या धोरणानुसार २०२५ पर्यंत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य होते. मात्र, आता या कालावधीत दोन वर्षांनी कपात केली गेली आहे. २०२३ पर्यंत मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी धोरण निश्चित केले आहे. हा क्रांतिकारी निर्णय राज्यातील साखर उद्योगाला तारणहार ठरणार आहे. यावेळी इथेनॉल मिश्रणाचे धोरण ठरविल्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, सर्व सभासद यांचे वतीने देशाचे पंतप्रधान व सहकार मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला
विषयपत्रिकेनुसार सभेच्या कामकाजास कार्यकारी संचालक यांनी सुरुवात केली. सर्व सभासदांनी ऑॅनलाईन प्रणालीद्वारे सहभाग घेतला. सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले, तर आभार संचालक प्रशांत सूर्यवंशी यांनी मानले
-----------------------
कारखान्याच्या शेअर्स भागाची मूल्याची किंमत १०,००० वरून रुपये १५,००० करण्यास यावेळी सभेत मंजुरी देण्यात आली वाढलेले ५,००० रुपये दोन हप्त्यांमध्ये कपात करण्यास मान्यता देण्यात आली.
------------------------
कर्मयोगी कारखान्याच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
२६०९२०२१-बारामती-०२