शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
2
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
3
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
5
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
6
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
7
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
8
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
9
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
10
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
11
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
12
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
13
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
14
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
15
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
16
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
17
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
18
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
19
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
20
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार

कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतलेत- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 1:38 PM

भाजपाने मागील ७ वर्षांच्या सत्तेच्या काळात देश ५० वर्षे मागे नेला. त्यांचा खरा चेहरा आता भारतीय जनतेला समजला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणी फसणार नाही. पोटनिवडणूकात जनतेने ते दाखवून दिले आहे असा दावा पटोले यांनी केला. 

पुणे: साखर कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतले आहेत. कोणाकोणावर आरोप करतात ते बघूच. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) जे बोलले त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सांगितले. पत्रकार संघातील कार्यक्रमाआधी पत्रकारांबरोबर बोलताना पटोले म्हणाले, भाजपाला सत्तेची गुर्मी चढली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले. अनेकांच्या घरातील कर्ते पुरूष गेले. असे असताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती लसीकरणाचे सेलिब्रेशन करत असेल तर दुर्दैवी आहे. कोरोनावर त्यांना प्रभावी ऊपाय करता आले नाहीत, उपचारांमध्येही भ्रष्टाचार केला. लक्ष दुसरीकडे वळवायचे म्हणून असले ऊद्योग त्यांना सुचतात.

ड्रग्जबाबत बोलताना पटोले म्हणाले, देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतात कसे याची चौकशी व्हायला हवी. यात भाजपाच्या निकटचे बडे उद्योगपती व भाजपाचे लोकही गुंतले असल्याचा काँग्रेसला संशय आहे. कोणकोण भागीदार आहे, कोणाचा हात आहे हे सगळे तपासात येईल, पण देशाच्या तरूणाईला अशा प्रकारे नादाला लावणे काँग्रेस खपवून घेणार नाही. शाहरूख खानच्या पोराच्या ड्रग प्रकरणाला भाजपा हिंदू मुस्लिम असा रंग देत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. काँग्रेस हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. सावरकर वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा वापर ते करतात, काँग्रेस नाही. कोणावर प्रेम कोणावर राग हा काँग्रेसचा विषयच नाही असे पटोले म्हणाले.

भाजपाने मागील ७ वर्षांच्या सत्तेच्या काळात देश ५० वर्षे मागे नेला. त्यांचा खरा चेहरा आता भारतीय जनतेला समजला आहे, त्यामुळे आता त्यांना कोणी फसणार नाही. पोटनिवडणूकात जनतेने ते दाखवून दिले आहे असा दावा पटोले यांनी केला. निवडणूक कशी लढणार हे आम्ही एकदा सांगितले आहे, त्याप्रमाणे आमचे काम सुरू आहे. काही गोष्टी सांगता येत नाहीत. संजय राऊत काय म्हणाले किंवा आणखी कोणी काय म्हणाले यावर आम्ही बोलणार नाही. आमचे ठरले आहे, काम सुरू आहे असे सांगत पटोले यांंनी निवडणूक विषयावर बोलणे टाळले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण