पुणे: 2 वर्षांचा कोरोना महामारीचा काळ संपल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्याचे शेकडो ऊसतोड कामगार टोळ्यांचे तालुक्यात आगमन होत आहे. परिसरात ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोड कामगार यांची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. निरा नरसिंहपुर परिसरातील पिंपरी बुद्रुक, टणु नरसिंहपूर गोंदी, ओझरे, सराटी, लुमेवाडी, लींबूडी, गणेश वाडी, 20 ते 25 ऊसतोड कामगारांच्या टोळ्या आल्या असून राहण्यासाठी घरे बांधण्याची लगबग सुरू आहे.
एका टोळीत दहा ते बारा कुटुंब व पंचवीस ते तीस मजुरांची संख्या आहे ऊस कामगार टोळ्या दाखल झाल्याने नरसिंहपूर ते पिंपरी बुद्रुक परिसराला साखर कारखानदारीचे स्वरूप आल्याचे जाणवत आहे. सदरच्या कामगार टोळ्या या महाराष्ट्र राज्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नगर, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मालेगाव, भुसावळ, जालना, या जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे आगमन इंदापूर तालुक्यात झाले आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली! काढणीस आलेल्या सोयाबीनला पावसामुळे धोका
प्रत्येक साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. मिनी ट्रॅक्टर व डबल ट्रॉली ट्रॅक्टर आणि ट्रक याचा उपयोग करून यांत्रिक वाहतुकीवर भर दिला आहे. परिसरातील तोडलेला ऊस वाहतूक लवकरच वेळेत पोहच होऊ शकणार असल्याने अल्प मजूर संख्येत वाहतूक व्यवस्थेत फायदा होणार असून व कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढण्याची ऊस तोड कामगार यांनी सांगितले. चालू वर्षी पावसाळा हंगाम वेळेत आल्याने शेतकऱ्यांच्या उसाला उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. साखर कारखाना गाळप क्षमतेसाठी ऊस टनेज वाडीचा जास्त फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.