शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

जिल्ह्यात चांगला पाऊस होताच ऊस लागवडीला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:09 PM

जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती : रब्बी पिकांपेक्षा ऊस लागवडच अधिकराज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेगया काळात देशात देखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक

पुणे : चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ऊस लागवडीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात २३ हजार ७३० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. रब्बी हंगामातील तृण व अन्नधान्यांपेक्षा ६ हजार हेक्टरने ऊस क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यामधील १३ पैकी १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पर्जन्य छायेतील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली आहे. राज्यात २०१७-१८ आणि २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात विक्रमी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या काळात देशामधेदेखील विक्रमी साखर उत्पादन झाल्याने यंदा १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने दिलेली ओढ, दुष्काळजन्य स्थितीमुळे चारा म्हणून उसाचा झालेला वापर आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या ऊस पट्ट्यामध्ये आॅगस्ट महिन्यात आलेला पूर यामुळे २०१९-२० हा अगामी गाळप हंगाम अडचणीत आला आहे. राज्यातील साखर उत्पादन ६० लाख टनापर्यंत खाली घसरेल, असा अंदाज आहे.  जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने नीरा धरणातून सोडलेले पाणी, मुठा उजवा कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे दौंड-इंदापूर भागातील भरलेले पाझर तलाव या मुळे शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदरमधे ऊस लागवडीच्या कामांना वेग आला आहे. शिरूरमध्ये सर्वाधिक ६,७७५, दौंडमधे ६,०६६ व बारामती तालुक्यात ३,५३८ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सरासरीपेक्षा ८९ टक्के पाऊस झालेल्या इंदापूर तालुक्यातही १ हजार ५९६ हेक्टरवर ऊस लागण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली. ,.........

जिल्ह्यातील ऊस लागवडीची स्थितीतालुका                सरासरी                लागवड     क्षेत्र              झालेले क्षेत्रहवेली                   ९५९५                    १४२६मुळशी               १८२१                      ८३१भोर                    १४२५                       ६४५मावळ              १५६६                           ०वेल्हे                 २११.७                         ०जुन्नर               ९६५३                      २४५खेड                   २९२८                        ०आंबेगाव           ३८२७                       ३९८शिरूर             १८,५६९                   ६,७७५बारामती      १६,११७                     ३५३८इंदापूर         ३१,२०१                     १५९६दौंड              ३१,२६१                    ६,०६६पुरंदर         २४५६                        २२०२एकूण          १,३०,६३१               २३,७३०.....................* जिल्ह्यात रब्बी पिकाचे ऊसासह ५ लाख २२ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र असून, पैकी ४१ हजार १५८ हेक्टरवरील पेरणी-लागवडीची कामे झाली आहेत. 

* ऊस पिक वगळून रब्बीचे क्षेत्र ३ लाख ९१ हजार ८९७ हेक्टर असून, १७ हजार ४२८ हेक्टरवर (४ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे. 

* उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३० हजार ६३१ हेक्टर असून, २३,७३० (१८ टक्के) हेक्टरवर लागवड झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस