भवानीनगर : छत्रपती कारखान्याकडे यंदा च्या गळीत हंगामासाठी 1क् लाख 18 हजार 85क् मे टन ऊस गळितासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी 7 लाख 5क् हजार मे. टन उसाचे गाळप करण्यात येईल. तर 2 लाख 68 हजार 85क् टन अतिरीक्त ठरणारा उस इतर कारखान्यांना गळीतासाठी देण्यास प्रयत्नशील आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी दिली.
मंगळवारी (दि 28) ‘छत्रपती’च्या गळीत हंगामाचा गव्हाण पूजन कार्यक्रम करण्यात आला.
घोलप म्हणाले, यंदा ऊस तोडणी कामगारांनी संप पुकारला आहे. हा संप लवकर न मिटल्यास गळीत हंगाम लांबण्याची भीती आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगार इतर राज्यात स्थलांतरीत होतील. त्याचा उस गाळपावर परिणाम होइल. यंदा हिच परिस्थिती आहे. साखरेचे दर 26क्क् ते 265क् रूपयांर्पयत घसरले आहेत. केद्र सरकारने ‘एफ आरपी’ एवढा दर देण्यासाठी हस्तक्षेप करुन अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे. मात्र हे अर्थसहाय्य कजर्रुपी न देता अनुदान स्वरुपात द्यावे. गेल्या गळीत हंगामात दिलेले बिनव्याजी अर्थसहाय्य माफ करावे. हा निर्णय घेतला तरच शेतकरी टिकेल. अन्यथा साखर कारखाने देखील कर्जामुळे डबघाईला येतील. सभासदांच्या मालकीची कारखानदारी मोडीत निघण्याची देखील भीती आहे.
‘छत्रपती’च्या विस्तारवाढीची निविदा अंतिम करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती. मात्र, आचारसंहिता शिथिल झाल्याने प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. कारखान्याने प्रकल्पासाठी स्व: भांडवलाची रक्कम 11 कोटी 41 लाख रुपये राखून ठेवली आहे. तसेच, राज्य शासनाकडून शासकीय भाग भांडवल 2 कोटी 1क् लाख रुपये मिळाले आहेत. तसेच, राज्य सहकारी बँक, जिल्हा बँकेने प्रकल्पासाठी आवश्यक कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे घोलप म्हणाले. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. नाईक उपस्थित होते. (वार्ताहर)
4राज्य शासनाने यामध्ये हस्तक्षेप करुन तोडगा काढावा. मागील गळीत हंगामात साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने राज्य बँकेने साखरेचा उचल दर कमीमंजूर केला. त्यामुळे ‘एफ आरपी’ प्रमाणो ऊस दर देणो अशक्य झाले.
4तत्कालीन केद्र सरकारने ‘एफ आरपी’ देण्यासाठी बिनव्याजी अर्थसहाय्य उपलब्ध केले होते.
‘छत्रपती’ ला 21 कोटी 44 लाख बिनव्याजी कर्ज मिळाले. त्यातून कारखान्याने ‘एफ आरपी’ एवढा दर दिला.