त्यावेळी सुहृद मंडळाच्या चारही कर्णबधिरांच्या शाळेतील विशेष शिक्षकांनी असा निर्धार केला की या काळात आपल्या कर्णबधिर मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे नाही. त्यांच्या समस्या सोडवण्यास, मार्गदर्शन करण्यास व शिकवण्यास व्हिडिओ क्लिपच्या आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचायचे.
या ऑनलाइन शिक्षण प्रकल्पाला पालक व विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद सकारात्मक आणि शिक्षकांचा उत्साह वाढवणाऱ्या होत्या. सुरुवातीला पालक या शिक्षण पद्धती बद्दल थोडे साशंक होते. विद्यार्थ्यांना हे सर्व अचंबित करणारे पण छान वाटत होते.
या व्हिडिओ मुळे कर्णबधिर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ,शिकवण्यासाठी साइन लैंग्वेज किती महत्त्वाची आहे व ती शिकलीच पाहिजे याची पालकांना जाणीव झाली.
कर्णबधीर विद्यार्थ्यांचे हे शिक्षण असेच उत्तमरित्या चालू ठेवण्यासाठी तसेच त्यांना विविध आवश्यक शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी , आम्हाला तुमच्या आर्थिक व इतर मदतीची अपेक्षा आहे याकरता सुहृद मंडळाशी संपर्क साधतात. (वा.प्र.)