सासवड : पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथे एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान निवृत्ती जगताप (वय ५५) हे दि. २९ रोजी शेतात पेरणी करण्यासाठी बैल व फौजफाटा घेवून गेले होते. दरम्यान त्यांची मुले नितीन व योगेश हे शेतात गेले असता बैल व आऊत आढळून मात्र वडील न दिसल्याने त्यांनी इतरत्र पाहणी केली. त्यावेळी शेतातील झोपडीत पहिले असता विषारी औषध प्राशन केले असून निपचित पडल्याचे दिसून आले. महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नागपूर, सोलापूर व इतर भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र सर्वात सुसंस्कृत व प्रगतशील समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही शेतकरी आता आत्महत्या करू लागले आहेत. त्यामुळे आत्महत्यांचे लोण आता ग्रामीण भागात पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यानंतर त्यांना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात घेवून आणल्यानंतर शव विच्छेदन करण्यात आले. याबाबत तुकाराम गणपत जगताप यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. यासंदर्भात पुढील तपास सहायक फौजदार डी. आर. गोरड हे करीत असल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल एन. बी. सस्ते यांनी दिली. (वार्ताहर)
सुपे येथे शेतकऱ्याची शेतात आत्महत्या
By admin | Published: October 01, 2015 1:04 AM