लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी (यवतमाळ ) : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा आर्थिक विवंचनेत दिवाळी कशी साजरी करायची, या विचाराने निराश झालेल्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला.यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथे एका शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. विठ्ठल गोविंदराव गंपरवाड (४५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ते घरून निघून गेले होते. बिटरगाव पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली आहे.अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील जावरा फत्तेपूर येथील एका शेतकºयानेही हाताशी आलेले सोयाबीन पावसामुळे भिजल्याने दिवाळी साजरी कशी होणार, या विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केली. अतुल उर्फ पिंटू साहेबराव रामपुरे (२६) असे मृताचे नाव आहे.जळगावातही आत्महत्याजळगाव : डोक्यावर १२ लाखांचे कर्ज व त्यात पिकांचे नुकसान झाल्याने निराश असलेल्या तुषार लक्ष्मण ढाके (३५, रा.ममुराबाद, ता.जळगाव ह.मु.पारखनगर, जळगाव) या शेतकºयाने रविवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तुषार बांभोरी येथील एका कंपनीत टेक्निशियनही होते. कंपनीत काम करून ममुराबाद येथे शेतीचे कामकाज सांभाळायचे. त्यांच्या पश्चात पत्नी धनश्री, मुलगी हास्य (७) व मुलगा तनय (५) आहे.शेतक-याने घेतला गळफासमुखेड (जि. नांदेड) : दिवाळी कशी साजरी करायची, या चिंतेतून तालुक्यातील शिकारा येथील शेतकरी माधव पुंडा गजगे (५५) यांनी शनिवारी रात्री घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ गजगे हे आपल्या ३९ गुंठे जमिनीवर उपजीविका चालवित होते़ तीन वर्षांपासून शेतातील नापिकी व स्टेट बँक आॅफ इंडियाचे कर्ज, यामुळे ते चिंतेत होते़ दिवाळीचा सण तोंडावर आल्याने तो कसा साजरा करायचा, याची चिंता त्यांना लागली होती़
आर्थिक विवंचनेतून दोन शेतक-यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 3:42 AM