चासकमान : चास (ता. खेड) दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाण्याचे होणारे बाष्पीभवन व पिण्यासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात येऊन नदीपात्र कोरडे ठणठणीत पडल्याने नदीअंतर्गत गावातील पाणी प्रश्न निर्माण झाला असून, चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भीमा नदीचे वाढत्या उन्हामुळे पात्र कोरडे ठणठणीत पडले असल्याने भीमा नदी अंतर्गत असलेल्या गावातील नळपाणी पुरवठ्याच्या योजना विस्कळीत झाल्याने गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, भीमा नदी अंतर्गत असलेल्या मोहकल, कमान, चास, आखरवाडी, नेहेरेशिवार, पाडळी, दोंदे, वडगाव आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना नदीपात्रातच पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहे. तसेच, भीमा नदीपात्रावर असणारा राजगुरुनगर येथील केदारेश्वरच्या बंधाºयावर राजगुरुनगर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. परंतु बंधाºयातील पाण्याने तळ गाठला असून, बंधाºयातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे राजगुरुनगर शहराला काही प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होऊ लागला असून पाण्याचा वास येऊनदुर्गधी पसरली आहे. परिणामी नागरिकांना पोटाचे विकार, आदी सह विविध आजार होऊ लागले आहे. यामुळे चासकमान धरणामधून भीमा नदीपात्रात तत्काळ पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.