शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आईला घराबाहेर काढणा-या मुलासह सुनेला न्यायालयाचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 7:37 PM

लालमहालजवळ राहत असलेल्या एका कुटुंबात गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

ठळक मुद्देवृध्द मातेला पोटगी देण्याचे आदेश : खर्चासाठी दरमहा १० हजार मिळणारत्रास देणा-या मुलाचे बुधवार पेठेत दोन कापडाची दुकाने सदनिका बळकाविण्यासाठी मुलाकडून सतत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून त्रास देणे सुरू मुलाच्या आणि सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

पुणे : सिलेंडरचे बटन सुरू ठेवून आईला जीवे मारण्याचा प्रयत्न, सदनिका बळकाविण्यासाठी शिवीगाळ करून तिला शारीरिक व मानसिक छळ करणा-या आणि जेवायला न देता जन्मदात्या आईला घराबाहेर काढणा-या व्यावसायिक मुलाला आणि सुनेला न्यायालयाला दणका दिला आहे.      याचिकाकर्त्या ७४ वर्षीय वृध्द आईस दैनंदिन गरजेसाठी पोटगी स्वरूपात आईला प्रतिमहा १० हजार रुपये देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी दिला आहे. तसेच मुलाने व सुनेने इतरामार्फत तसेच स्वत: वृध्द आईला त्रास न देण्याचे आदेश दिले असून त्या राहत असलेल्या घरात  जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत वृध्द महिलेने अ‍ॅड. योगेश पवार, अ‍ॅड. हेमंत भांड आणि अ‍ॅड. अभिजीत बिराजदार यांच्यामार्फत मुलगा आणि सुनेविरूध्द न्यायालयात धाव घेतली होती. लालमहालजवळ राहत असलेल्या एका कुटुंबात गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तक्रारदार महिलेस दोन विवाहित मुले व एक विवाहित मुलगी आहे. वृध्द महिलेनी स्वकष्टातून सदनिका खरेदी केली होती. तक्रारदार आणि त्यांचे पती घराजवळच भेळीचा व्यावसाय करीत. पतीच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा, त्याची पत्नी आणि नातवंडे जबरदस्तीने तक्रारदार यांच्या घरात राहत होती. त्रास देणा-या मुलाचे बुधवार पेठेत दोन कापडाची दुकाने आहे. त्याची पत्नी त्याला व्यवसायात मदत करते.     तक्रारदार यांना जेवायला न देणे, गॅस सिलेंडरचे बटन सुरू ठेवून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार त्यांच्या सुनेकडून सुरू होते. तर सदनिका बळकाविण्यासाठी मुलाकडून सतत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून त्रास देणे सुरू होते. मुलाच्या आणि सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणाच दोषारोपपत्र देखील दाखल झाले आहे. त्यानंतरही मुलाचा आणि सुनेचा जाच सुरूच होता. त्यामुळे दोघांच्याही त्रासाला कंटाळून वृध्द आईने महिलांचा घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत दैनदिन गरजांसाठी पोटगीची मागणी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अ‍ॅड. योगेश पवार यांनी केलेल्या युक्तीवादनंतर वृध्द आईला मुलाने १० हजार पोटगी द्यावी, असे आदेश दिले आहेत. तसेच मुलाला आणि सुनेला वृध्द आईच्या सदनिकेत जाण्यापासून मज्जाव केला आहे. मुलाने याआधी एक फ्लॅटही विकलातक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीने कात्रज येथे एक प्लॅट घेतला होता. लोन करण्यासाठी तो प्लॅट मुलाने नावाकरून घेतला. त्यानंतरही त्याचा त्रास सुरू असल्याने त्याने कात्रजला रहायला जावे, असे तक्रारदार यांनी त्याला सांगितले. मात्र त्याने परस्पर तो फ्लॅट विकून टाकून तक्रारदार यांच्यांत घरात राहू लागला, अशी माहिती अ‍ॅड. पवार यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिस