लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : घरातील ज्येष्ठ मंडळी अलिकडे अडगळ ठरु लागली आहेत. कोरोनाच्या काळात ही बाब अधिक प्रकर्षाने समोर आली आहे. पुण्यात या वर्षात भरोसा सेलमधील ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे ३०९ तक्रारी ज्येष्ठांकडून नोंदवण्यात आल्या. त्यात सर्वाधिक मानसिक व शारीरीक त्रासाच्या तक्रारी आहेत.
महिला, बाल तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पुणे शहरात भरोसा सेल सुरु करण्यात आला आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या वर्षी जानेवारीपासून २१ नोव्हेंबरपर्यंत या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे ३०९ तक्रारी आल्या. त्यापैकी २६४ तक्रारीमध्ये समुपदेशनाद्वारे तडजोड घडवून आणण्यात आली. ३५ तक्रारी सध्या प्रलंबित आहेत.ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्याने मानसिक व शारीरीक त्रास होत असल्याच्या २१३ तक्रारी आल्या आहेत. मालमत्तेसंबधीत ३५ तक्रारी असून आर्थिक बाबींच्या १९ तक्रारी कक्षाकडे आला होत्या. तर इतर कारणांच्या ४२ तक्रारी होत्या. अनेकदा तक्रार अर्ज आल्यानंतर प्रत्यक्ष दोन्ही बाजूंकडील लोकांशी बोलल्यानंतर मुख्य कारण वेगळेच असल्याचे जाणवते. गैरसमजातूनही अनेक जण ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे धाव घेत असल्याचे आढळून आले.
ज्येष्ठांच्या तक्रारीn सुना मुलांच्या भांडणात आमचा होतोय छळn घरातून हकलून देण्याची दिली जातेय धमकीn घटस्फोटासाठी मुलाच्या सांगण्यावरुन सुनेविरूद्ध तक्रारीn मुलींनाच मालमत्ता दिल्याने मुलाकडून त्रास
ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे प्रामुख्याने मुलगा, सुन व्यवस्थित वागवत नाही. मुलगा व सुनांच्या भांडणामध्ये आम्हाला त्रास दिला जातो. मुलींनाच मालमत्ता देण्याची काही ज्येष्ठांची इच्छा असते. त्यामुळे घरात वादावादी होत असल्याचे या तक्रारीवरुन दिसून येते.- शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक, ज्येष्ठ नागरिक कक्ष.