पुणे : पुण्यात होणारा सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत फेस्टिव्हलसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविण्यासाठी धावपळ सुरू होती. फेस्टिव्हलसाठी पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांची अंतिम परवानगी मंगळवारी (दि. २७) रात्री उशिरापर्यंत देण्यात आली नव्हती.अमली पदार्थांचा गैरवापर व इतर अनेक गोष्टींमुळे गोव्यात वादात सापडलेला सनबर्न फेस्टिव्हल यंदा पुण्यात होत आहे. पुण्यात २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हा फेस्टिव्हल होणार आहे. यामध्ये तब्बल १५० विदेशी कलाकार सहभागी होणार असून, सुमारे १६ विदेशी बँ्रडच्या बारची रेलचेल येथे असणार आहे. या फेस्टिव्हलसाठी पोलीस, उत्पन्न शुल्क, गृहसह अनेक विभागांच्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परंतु हे प्रमाणपत्रही अद्याप घेण्यात आलेले नाही. फेस्टिव्हलचे व्यवस्थापक हरबिंदरसिंग यांनीही, जिल्हा प्रशासन, पोलिसांकडून सोमवारी पाहणी झाली आहे; मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याचे सांगितले. केंद्र शासनाने या फेस्टिव्हलला पाठिंबा दिल्याचा दावाही त्यांनी केला.
सनबर्न फेस्टिव्हलला अद्याप नाही परवानगी
By admin | Published: December 28, 2016 4:35 AM