पुणे : शहरात रविवारी १९६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ७५५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.४० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ४१ इतकी आहे. आज दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर १.८० टक्के आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २१७ असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९० इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख ३३ हजार ९१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार १८३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर यापैकी ४ लाख ८७ हजार १६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ९७७ जणांचा मृत्यू झाला आहे.