पुणे : शहरात रविवारी ३६४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ५८ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ५़ १५ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रूग्णसंख्या २ हजार ९५४ इतकी असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २३६ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४८५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ८५ हजार ७३२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८३ हजार ८८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७२ हजार २४० जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६९० जणांचा मृत्यू झाला आहे.