सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले 35 लाखांचे कर्ज; जाणून घ्या त्यांची मालमत्ता!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:33 AM2024-04-19T06:33:23+5:302024-04-19T06:34:23+5:30
सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पती अजित पवार यांची देखील संपत्ती उघड केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची स्थावर व जंगल मालमत्ता ७१ कोटी रुपयांची असून, त्यांच्यावर १२ कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी २ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज इतरांना दिले. सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार व नणंद सुप्रिया सुळे यांना ३५ लाखांचे तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाखांचे कर्ज दिले. पती अजित पवार यांनाही ६३ लाखांचे व सासू आशाताई पवार यांना ८२ लाखाचे कर्ज दिले दिल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
सुनेत्रा पवार यांची मालमत्ता
जंगम मालमत्ता १२.५६ कोटी रुपये
स्थावर मालमत्ता ५८.३९ कोटी रुपये
बँकांमध्ये गुंतवणूक २.९७ कोटी रुपये
शेअर्स व इतर गुंतवणूक १५.१९ लाख रुपये
एलआयसीमध्ये गुंतवणूक ५७.७६ लाख रुपये
सोने, चांदी व हिऱ्याचे दागिने ३४.३९ लाख रुपये
रोकड ३.९६ लाख रुपये
जमीन ५८ एकर ६८ गुंठे
पुण्यातील कल्याणीनगर, पाषाण, बिबवेवाडी तसेच मुंबईमध्ये फ्लॅट
अजित पवारांकडे ५० कोटींची मालमत्ता
- सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पती अजित पवार यांची देखील संपत्ती उघड केली आहे. त्यानुसार अजित पवार यांच्याकडे ५० कोटी ४० लाख ७६ हजार ६२ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.
- ३ लाख १२ हजार रुपयांची रोख रक्कम असून, बँक खात्यातील ठेवी २ कोटी २७ लाख रुपयांच्या आहेत. बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स यामधील गुंतवणूक ३४ लाख ८८ हजार ८५८ रुपयांची आहे.
धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख रुपये
मविआचे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे ८ कोटी १६ लाख ६५ हजार १४३ रुपयांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता आहे. त्यांच्यावर एकूण ७१ लाख १५ हजार ४३५ रुपयांचे कर्ज आहे.
अमोल कोल्हेंकडे आठ कोटी १२ लाखांची संपत्ती
डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे ८ कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीकडे एकूण ३ कोटी ९९ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केली आहे. कोल्हे यांच्याकडे ‘पेजेरो’ ही चारचाकी गाडी असून, तिची किंमत ७ लाख ४२ हजार रुपये इतकी आहे. तसेच बुलेट दुचाकी आहे.