इंदापूर : आपण आपल्या करिअर व परिवारासाठी चांगलीच स्वप्न पाहतो. आम्ही तुमच्या या स्वप्नांचा कॅनव्हास थोडा मोठा करतो. या युवा महोत्सवानिमित्ताने आपली सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्कृती वृद्धिंगत व्हावी, यातून मिळालेल्या नवीन दृष्टकोनातूनच आपण मानवजातीच्या कल्याणाचं स्वप्न बघायला शिकलं पाहिजे असे आवाहन बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित शरद युवा महोत्सवात बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा पवार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते.युवा महोत्सवाची सुरुवात प्रेरणादायी संदेश रेखाटन करून करण्यात आली. यावेळी ‘लागीर झालं जी’ मधील अजिंक्य व शीतल तसेच पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक घोगरे, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे, सोहेल खान, विठ्ठल ननवरे, वर्धमान शहा, नीलेश राऊत, श्रीधर बाब्रस आदी उपस्थित होते.शरद युवा महोत्सवाचे खास आकर्षक म्हणून झी मराठी वाहिनीवरील ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील अजिंक्य व शीतल यांनी या महोत्सवाच्या मंचावर हजेरी लावून मालिकेतील अनेक संवादम्हणून दाखवले. लागीरं झालं जी च्या टायटल साँगने महोत्सवाला सुरवात करण्यात झाली.गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणीशरद युवा महोत्सवातील हजारो युवक युवतीची उपस्थिती पाहून आमदार दत्तात्रय भरणे यांना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ताज्या झाल्या.त्यांनी आपल्या मनोगतात सुरुवात करतानाच ‘गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी’अशा शब्दात महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
महोत्सवातून यावा मानव कल्याणाचा दृष्टिकोन - सुनेत्रा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:57 PM