‘बांधकाम मजुरांच्या सुरक्षेला क्रेडाई संस्था कायमच प्राधान्य देते. बांधकाम मजुरांसाठी क्रेडाई विशेष लसीकरण मोहीम लवकरच हाती घेत आहे. या माध्यमातून राज्यातील १० लाख नोंदणीकृत बांधकाम मजुरांना तसेच सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना कोविड १९ प्रतिबंधक लस मोफत देणार असल्याची घोषणा नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील फुरडे यांनी केली.
क्रेडाईचे राष्ट्रीय चेअरमन सतीश मगर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, क्रेडाईच्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे जितेंद्र ठक्कर, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, क्रेडाई महाराष्ट्राचे मावळते अध्यक्ष राजीव पारीख यांच्यासह क्रेडाई महाराष्ट्राचे १२०० हून अधिक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी दर महिन्यातून एकदा होणाऱ्या ‘रेड’ (रियल इस्टेट डेव्हलपर्स टॉक्स) या संकल्पनेची देखील घोषणा फुरडे यांनी केली.
इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे :-
या सर्वसाधारण सभेत प्रमोद खैरनार यांची (अध्यक्ष, नियुक्त) तर उपाध्यक्षपदी महेश साधवानी, रसिक चव्हाण, प्रफुल्ल तावरे, आय. पी, इनामदार, दीपक सूर्यवंशी, रवी कडगे यांची निवड झाली. तर सचिवपदी सुनील कोतवाल व शशीकांत जिद्दिमनी हे खजिनदारपदी निवडून आले. याबरोबरच सुहास मर्चंट यांची राज्य, सल्लागार समितीपदी तर अनिश शहा, संजय गुगळे, नरेंद्रसिंग जबिंदा, दिनेश ढगे, सुधीर ठाकरे, दीपक साळवी यांनी सहसचिव पदाची जबाबदारी स्वीकारली.
फोटो - सुनील फुरडे