पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने 'संकल्प नशा मुक्ती' अभियानाअंतर्गत रविवारी लोणावळा शहरात विशेष मॅरेथॉनचे आयोजन केले असून त्यामध्ये सिने अभिनेता सुनील शेट्टी सहभागी होणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी दिली.
लोणावळा शहरात पर्यटनाच्या निमित्ताने राज्यभरातील तरुणाई गर्दी करते त्याचाच गैरफायदा घेत येथे ड्रग्जचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहे तो मुळासकट उपटून काढण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसानी पुणे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शानाखाली ' संकल्प नशामुक्ती' हा विशेष अभियान राबवला आहे. त्यामध्ये गुन्हेगारांवर कारवाई, तरुणांचे प्रबोधन, आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन अशा तीन मुद्यांवर पोलिस काम करत आहेत. त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी हे ब्रॅड ॲम्बॅसिटर म्हणून इनिशियेटिव्ह घेत आहेत.
प्रबोधनाच्या कार्यक्रमांर्गत रविवारी (४ जून) रोजी हा लोणावळा शहरामध्ये हा मॅरेथॉन आयोजिली असून आहे. तीन गटामंध्ये ही स्पर्धा होत असून पहिल्या गट १६ ते १८. दुसरा गट १९ ते २५ आणि २५ च्या पुढे अशा गटात ही स्पर्धा होणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसाच्या वेबसाईरवर लिंक देण्यात आली असून जास्ती जास्त नागरिकानी यात सहभागी व्हावे असे आवाहन पलोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी केले.
सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे
तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज आहे त्यातून त्यांची सुटका करणे आणि त्या व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून तरुणाइला रोखणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसानी हा ' संकल्प नशामुक्ती' हे अभियान सुरु आहे त्यासाठी अभिनेता सुनील शेट्टी इनिशियेटिव्ह घेत आहेत आपण सर्वानीही यात सहभागी व्हावे आणि रविवारी होणाऱ्या दौड मध्ये सहभागी व्हावे. - अंकित गोयल, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण.
मॅरेथॉनसाठी मोफत रजिस्ट्रेशन (लिंक अशी)
येत्या रविवारी लोणावळा येथील दाउदी बोहरा ग्राउंड येथे सकाळी सहा वाजता ही मॅरेथॉन सुरु होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी टी शर्ट, रिफ्रेशमेंट देण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या वेब साईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असून रजिस्त्रेशन मोफत आहे. त्याची लिंक अशी - https://puneruralpolice.gov.in/