सुनील सोडनवर यांनी यापूर्वी उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे. सर्व सरपंचपद सर्वसाधारण असल्याने या पदासाठी चुरस निर्माण झाली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये कुल व थोरात समर्थकांना संमिश्र बहुमत मिळाल्याने दोन्ही गटांनी पदाधिकारी निवडण्याचे सर्व अधिकार भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांना दिली होते. आनंद थोरात आणि सर्वांची मते विचारात घेऊन सोडनवर व मगर यांना संधी दिली आहे. आगामी काळामध्ये भीमा पाटसचे उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीपार्धी गावाचा सर्वांगीण विकास करू, असे प्रतिपादन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोरमलनाथाचे दर्शन घेतलेे.
यावेळी डी. डी. धायगुडे, बाळासाहेब किसन सोडनवर, भानुदास नेवसे, त्रिंबक सोडनवर, रघूनाथ सरगर, शहाजी सोडनवर, संजय धायगुडे, सुरज शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. ताथवडे व विठ्ठल रावते यांनी काम पाहिले.
१० केडगाव बोरीपार्धी
निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.