पुणे :पुणे शहरातील प्रमुख आठ विधानसभा मतदारसंघांत चार आमदार सर्वाधिक निधी खर्च करण्यात आघाडीवर राहिले आहेत. सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षात दीडशे टक्क्यांपर्यंत निधी खर्च करण्याची सर्वच आमदारांना परवानगी होती. यामध्ये आमदार सुनील कांबळे (१४९.२४ टक्के), सिद्धार्थ शिरोळे (१४२.४६ टक्के), चेतन तुपे (१३१.६० टक्के), सुनील टिंगरे (१२९.६० टक्के) यांनी आघाडी घेत तब्बल १३० ते १५० टक्क्यांपर्यंत निधी खर्च केला आहे. तसेच उर्वरित आमदारांमध्ये मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील यांनी शंभर टक्क्यांहून अधिक निधी खर्च केला आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन विभागाच्या १ मार्च २०२२ च्या आकडेवारीनुसार या विकासकामांबाबतची माहिती समोर आली आहे. शिल्लक राहिलेल्या निधीपैकी ५० टक्के निधी हा पुणे शहरातील प्रत्येक आमदाराला पुढील आर्थिक वर्षात साधारणपणे ५० टक्के शिल्लक राहिलेला निधी खर्च करता येणार आहे. एकंदर पुणे शहरातील सर्वच आमदारांनी आपला विकास निधी पूर्ण खर्च करत मतदारसंघात विविध विकासकामे करण्यासाठी जोर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रत्येक आमदाराला मिळतो पाच कोटींचा निधी
आमदारांना सुरुवातीला ५० लाख रुपये त्यानंतर १ कोटी रुपये, नंतर दीड कोटी अशी टप्प्याटप्प्याने आमदार निधीत वाढ करण्यात आली आहे. सन २०११-१२ मध्ये हाच निधी दीड कोटीवरून दोन कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. मग तब्बल दहा वर्षांनंतर आमदार निधीत वाढ केली. सन २०२०-२१ मध्ये ३ कोटी रुपये, २०२१-२२ मध्ये ४ कोटी रुपये, तर चालू २०२२-२३ मध्ये पाच कोटी रुपयांपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रत्येकी एक कोटीने वाढ करण्यात आली आहे.
१) पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ : सुनील कांबळे
मतदारसंघात सर्वाधिक निधी खर्च करण्यात पुणे कॅन्टोन्मेंटचे (लष्कर) आमदार सुनील कांबळे आघाडीवर आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील ८४ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम वाढवून देण्यात आली होती. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ४ कोटी ७० लाख ११ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी १४९.२४ टक्के विकास निधी खर्च केला आहे.
२) शिवाजीनगर मतदारसंघ : सिद्धार्थ शिरोळे
मतदारसंघात सर्वाधिक निधी खर्च करण्यात शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील १ कोटी ६ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम वाढवून देण्यात आली होती. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ४ कोटी १८ लाख ८ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी १४२.४६ टक्के विकास निधी खर्च केला आहे.
३) हडपसर मतदारसंघ : चेतन तुपे
मतदारसंघात सर्वाधिक निधी खर्च करण्यात हडपसरचे आमदार चेतन तुपे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील १ कोटी ३१ लाख ७० हजार रुपयांची रक्कम वाढवून देण्यात आली होती. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ३ कोटी ५३ लाख ७ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी १३१.६० टक्के विकास निधी खर्च केला आहे.
४) वडगावशेरी मतदारसंघ : सुनील टिंगरे
मतदारसंघात सर्वाधिक निधी खर्च करण्यात वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील ७८ लाख २५ हजार रूपयांची रक्कम वाढवून देण्यात आली होती. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ४ कोटी १६ लाख ९९ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी १२९.६० टक्के विकास निधी खर्च केला आहे.
५) कसबा पेठ मतदारसंघ : मुक्ता टिळक
मतदार संघात शंभर टक्के निधी खर्च करण्यात कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आघाडीवर आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील १ कोटी १३ लाख ३६ हजार रुपयांची रक्कम वाढवून देण्यात आली होती. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ३ कोटी २६ लाख ५४ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी ११३.९२ टक्के विकास निधी खर्च केला आहे.
६) पर्वती मतदारसंघ : माधुरी मिसाळ
मतदार संघात शंभर टक्के निधी खर्च करण्यात पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील शिल्लक निधी नव्हता. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ४ कोटी २० लाख ८७ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी १०५.२२ टक्के विकास निधी खर्च केला आहे.
७) खडकवासला मतदारसंघ : भीमराव तापकीर
मतदार संघात शंभर टक्के निधी खर्च करण्यात खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील ९५ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम वाढवून देण्यात आली होती. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ३ कोटी १८ लाख ४ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी १०४.६० टक्के विकास निधी खर्च केला आहे.
८) कोथरूड मतदारसंघ : चंद्रकांत पाटील
मतदार संघात शंभर टक्के निधी खर्च करण्यात कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आहेत. त्यांना एकूण ४ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यात मागील वर्षातील शिल्लक निधी नव्हता. मंजूर झालेल्या दीडपट कामांमध्ये ४ कोटी ४ लाख ७१ हजार रुपये प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली आहे. म्हणजे त्यांनी दीडशे टक्क्यांपैकी १०१.१८ टक्के विकास निधी खर्च केला आहे