शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सुपर मॉम, स्मार्ट किड्स १९ रोजी

By admin | Published: November 17, 2016 4:14 AM

कुटुंबामध्ये आईचे स्थान आपल्या मुलांच्या अतिशय जवळ असते. नेमके हेच नाते उलगडणारा एक कार्यक्रम लोकमत सखी मंच आणि झी टीव्ही घेऊन येत आहेत.

पुणे : कुटुंबामध्ये आईचे स्थान आपल्या मुलांच्या अतिशय जवळ असते. नेमके हेच नाते उलगडणारा एक कार्यक्रम लोकमत सखी मंच आणि झी टीव्ही घेऊन येत आहेत. कारण सखी ही गृहिणी, आई, बहीण, मुलगी इ. भूमिका पार पाडत असते. आपल्या कुटुंबावर कुठलेही संकट आले, तरी आपल्या कुटुंबाला निडरपणे वाचवीत असते. तसेच लहान मुलांमध्येही राक्षसाला घेऊन एक उत्सुकता असते. या कार्यक्रमाला लहान मुलांकरिता स्केचिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम दि. १९ रोजी दुपारी १२ वाजता इन्डोर स्टेडियम, एस. एम. जोशी महाविद्यालय, सानेगुरुजी हॉस्पिटलसमोर,माळवाडी, हडपसर येथे होणार आहे. सुपर मॉम स्मार्ट किड्स आई आणि मुलांच्या नात्यातले विविध पैलू या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. ४ फेऱ्यांमधून ही स्पर्धा होईल. यात पहिली फेरी स्वपरिचय, ज्यात आईने मुलाचा परिचय करून द्यायचा आहे. तर मुलाने आईचा.दुसरी फेरी म्हणजे कलाविष्कार फेरी. यात दोघे मिळून कुठलीही कला प्रस्तुत करायची आहे. जसे नृत्य, अभिनय, मिमिक्री, गायन, वादन अथवा कुठलीही कला.तिसरी फेरी म्हणजे, दिल तो बच्चा है जी... यात आईने लहान दिसायचे आहे, तर मुलांनी मोठे दिसायचे आहे. चौथी फेरी असेल परीक्षक फेरी. यात परीक्षकांकडून प्रश्न विचारण्यात येतील. अशा चार स्वरूपांत आई मुलांच्या नात्यातला हळूवारपणा त्यांची परस्परांशी असलेली जवळीकता एकमेकांना समजून घेण्याची कला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आईच्या वयाला मर्यादा नाही; पण मुला-मुलींचे वय ८ ते १५ या वयोगटात असावे. स्पर्धा नि:शुल्क असून,या व्यतिरिक्त कार्यक्रम बघायला आलेल्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. झी टीव्हीतर्फे ब्रह्मराक्षस ही नवीन मालिका ६ आॅगस्टपासून सुरू झालेली आहे. ही मालिका दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित होते. बालाजी टेलिफिल्म्स च्या या मालिकेत मुख्य भूमिका अहम शर्मा, रक्षंदा खान, किश्वर मर्चंट आणि क्रिस्टल डिसुजा यांनी पार पाडली आहे. रहस्य, रोमांच आणि थरारक तसेच उपयुक्त कलेने सजलेली ही मालिका प्रेक्षकांना फार आवडत आहे.ब्रह्मराक्षस ही अशा तरुण-युवती रैनाची गोष्ट आहे. जी मुंबईहून एका लग्नात सहभागी होण्याकरिता कमलापूरला येते. तिथे रैना व रिषभ आपल्या एका प्रिय व्यक्तीला गमावतात. जी ब्रह्मराक्षसच्या आहारी गेली असते. ब्रह्मराक्षसचा पर्दाफाश करण्यासाठी एक योजना आखतात व त्या योजनेदरम्यान ते दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतात. - मायडेंटिस्ट ही भारतातील सर्वांत मोठी डेंटल क्लिनिक्सची साखळी असून, ती लोकमत सखी मंच २0१६ साठी अधिकृत ओरल केअर भागीदार असेल आणि ती सर्व सहभागींना मोफत दंत तपासणी करून देईल. -  पुण्यातील १६ क्लिनिकमध्ये सर्वत्र संपूर्ण वयोगटांसाठी ३२ निरोगी दातांकरिता सर्वांगीण उपाययोजना परवडणाऱ्या दरात आहेत.  - शहरासाठी दंत आरोग्य सुधारण्याच्या त्यांच्या मोहिमेत ते एक खास कौटुंबिक दंत आरोग्य पर्याय देत असून, त्यातून पुण्यातील सर्वांना निरोगी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच कार्यक्रमाला भेट द्या.-  हा कार्यक्रम दि. १९ रोजी दुपारी १२ वाजता इन्डोर स्टेडियम एस. एम. जोशी महाविद्यालय, साने गुरूजी हॉस्पिटलसमोर, माळवाडी, हडपसर येथे होणार आहे. - नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : फोन नं. 0२0-६६८४८५८६, वेळ सकाळी : ११ ते सायंकाळी ५ पर्यंत. -ड्रॉइंग शीट व पेन्सिल ‘लोकमत’कडून पुरविल्या जाईल. सर्व सखी मंच सदस्य, बाल विकास मंच सदस्य कार्यक्रम बघण्याकरिता व स्पर्धेकरिता आमंत्रित.