पुणे : उन्हाळ्यातील गर्दीच्या वेळी प्रवाशांची अतिरिक्त संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनेपुणे आणि कानपूर सेंट्रल दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार रेल्वे नं. ०१०३७ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वे ३ मे ते १४ जून दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१० च्या सुमारास पोहोचेल. तर रेल्वे नं. ०१०३८ साप्ताहिक विशेष रेल्वे ४ मे ते १५ जून दरम्यान दर गुरूवारी कानपूर सेंट्रल येथून सकाळी ०८:५० च्या सुमारास सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२ च्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
दरम्यान ही रेल्वे दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर , कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन आणि उरई या रेल्वे स्थानकावर थांबेल. रेल्वे नं. ०१०३७ साठी विशेष शुल्कासह बुकिंग सुरू झाले असून आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावरून देखील प्रवाशांना तिकीट बुक करता येणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.