पुणे : नवऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात अंकुश मन्नू राठोड (रा. जळकोट रामतीर्थ तांडा, उस्मानाबाद) याच्या विराेधात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.
हा प्रकार २०१७ ते २०१८ दरम्यान आणि ९ नोव्हेंबर रोजी घडला, असे ३५ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने पीडित महिलेवर लोहारा आणि वाघोली परिसरातील निर्जनस्थळी अत्याचार केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती लोहारा येथील लोकमंगल कारखान्यात कामाला आहेत. तर आरोपी हा महिलेच्या पतीचा सुपरवायझर आहे. त्याने पतीला कामावरून काढून टाकण्याची व मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच महिलेला हाताने मारहाण करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या सततच्या त्रासाला वैतागून महिलेने मंगळवारी (दि. ५) लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.