शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

दूध ओतून संपास पाठिंबा

By admin | Published: June 02, 2017 2:59 AM

पुणे-नगर महामार्गावर दूध ओतून वाघोलीतील दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच बाजार मैदानामध्ये

वाघोली : पुणे-नगर महामार्गावर दूध ओतून वाघोलीतील दुग्धव्यावसायिक शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच बाजार मैदानामध्ये तरकारी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांनी आज पाठ फिरविली. व्यापाऱ्यांनी शेतमालाचा साठा करून ठेवल्याने शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीचा फारसा परिणाम वाघोलीतील बाजारामध्ये जाणवला नाही.शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाजार मैदानामध्ये दररोज तरकारी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील तरकारी विक्री करण्यास पाठ फिरविली. दोन-तीन शेतकरी माल घेऊन विक्री करण्यासाठी आले होते; परंतु इतर शेतकऱ्यांची अनुपस्थिती आणि संप पुकारल्याची परिस्थिती पाहून पुन्हा परतले. दररोज केसनंद, मांजरी, कोलवडी, आव्हाळवाडी, भावडी परिसरातील सरासरी ३० शेतकरी तरकारी घेवून वाघोलीच्या बाजारामध्ये येत असतात. आज संपाच्या परिणामामुळे एकही शेतकरी उपस्थित राहिला नाही. संप असल्याकारणाने बाजारातील व्यापाऱ्यांनी शेतमालाचा साठा करून आज दिवसभर विक्री केली; यामुळे संपाचा फारसा परिणाम नागरिकांवर जाणवला नाही.संपामुळे दुधाचा तुटवडाधनकवडी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा परिणाम भाजीपाला तसेच दुधावर झाला असून खरेदी निम्म्यावर आली. काल खरेदी करून रात्री संप सुरू होण्यापूर्वी आलेले दूध गुरुवारी विकले जात होते. परंतु संकलन केंद्रावर दुधाची खरेदी निम्म्यावर पोहोचली असून, संकलन झालेले दूध गुरुवारी रात्री डेअरीपर्यंत पोहोचू शकले तर शुक्रवारी विक्री होऊ शकणार आहे, अन्यथा दुधाचा तुटवडा जाणवणार आहे, व त्याला दूध पावडरसारखा अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने शहरी ग्राहकांचे हाल होणार असल्याचे चित्र आजच दिसू लागले आहे.पुण्यात आज चितळेचा दूध पुरवठा सुरळीतपुणे : सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील चितळे डेअरीकडून दूध संकलन करण्यासाठी जाणाऱ्या गाड्या परिस्थिती लक्षात घेऊन बंद ठेवल्या आहेत़ मात्र, जे शेतकरी स्वत: दूध आणून डेअरीत घालतील, त्यांचे दुध स्वीकारले जाणार आहे़ पुण्यात शुक्रवारी दुधपुरवठा सुरळीत असणार आहे़ याबाबत चितळे समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले, की शेतकरी संपामुळे परिस्थिती तणावाची आहे़ त्यामुळे भिलवडी येथून गावागावात दूध संकलनासाठी जाणाऱ्या गाड्या सध्या बंद ठेवण्यात येणार आहे़ पुण्यात दररोज साधारण साडेचार लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो़ या गाड्या भिलवडीहून निघाल्या असल्याने शुक्रवारी पुणे शहरात दूध पुरवठा व्यवस्थित होणार असल्याचे त्यांनी सांगितले़