शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

‘नो शेव्हिंग नोव्हेंबर’ला मिळतोय तरुणांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 3:26 PM

व्हायरल ट्रेंड : संस्थांना देताहेत मदत; मोहीम जगभरात राबवितात

ठळक मुद्दे‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणत वाढत्या दाढीची स्टाइल

- तेजस टवलारकर पुणे : नोव्हेंबर महिना आणि दाढीचा अनोखा संबंध आता दृढ होतोय. हा महिना सोशल मीडियाच्या जगात ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू असून, प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जनजागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. कर्करोग झालेल्या रुग्णाचे केस गळतात. त्यामुळे आपण केस वाढवून, दाढी न करता पैसे वाचवून ते कॅन्सरग्रस्तांसाठी आणि पुरुषांना होणाऱ्या आजारांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांना द्यायचे, या हेतूने ही मोहीम जगभरात राबविली जाते; पण अनेक जण व्हायरल ट्रेंड म्हणून नोव्हेंबर महिन्यात दाढी करत नाहीत.‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणत दाढी वाढवणारे तरुण याच वाढत्या दाढीची स्टाइल करवून घेत आहेत. अनेक जण मेन्स पार्लरमध्ये दाढी सेट करण्यासाठी गर्दी करत आहेत. या नव्या लूकला सूट होणारी हेअर स्टाइल करून घेण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. दाढीसोबत केसही वाढवत अनेकांनी वेगळी हेअर स्टाइल करत आहेत. फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आदी सोशल मीडियावर सध्या दाढीला फारच महत्त्व आलेले दिसून येत आहे. आकर्षक लूक  दिलेले फोटो येथे सर्रास पोस्ट करण्यात येत आहेत. सध्या प्रत्येकच तरुण आपल्या दाढीला स्टायलिश, हटके लूक देत असतात. स्पॅरो, डकटेल, फ्रेंडली मटनचॉप्स आदी दाढीचे विविध स्टायलीश प्रकार आपल्या चेहºयावर ठेवून नो शेव्ह नोव्हेंबरचा ट्रेंड पाळला जात आहे. दाढीच्या अस्सल भारतीय लूकला ‘देशी लूक’, ‘बिअर्ड बाबा’ अशा नावे दिली जात आहे. हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल मीडियावर याला फॉलो केल्या जात आहे. जगभरात हा ट्रेंड शहरातही फॉलो केला जात आहे. मात्र, या ट्रेंडमुळे तरुणांच्या  चेहºयावर नवनवीन दाढीचे प्रकार बघायला मिळत आहेत. ..................‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणजे काय? ४‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा संपूर्ण जगात कॅन्सरबद्दल जागृती करण्यासाठी साजरा केला जातो. कॅन्सरमुळे केस गमावलेल्या रुग्णांना पाठिंबा देण्यासाठी पाळला जातो.  ४१९९९ साली मेलबर्नमधील काही युवकांनी ही संकल्पना सुरू केली. आता सर्वत्र नो शेव्ह नोव्हेंबर हा ट्रेंड म्हणून पाळला जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू आहे........सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या मोहिमेला पाठिंबा दिला जात आहे. मी पण गेल्या वर्षीपासून ‘नो शेव्ह नोव्हेंबर’च्या ट्रेंडला पाठिंबा देत आहे. मी पण दाढी वाढवली आहे.        - तैसिफ सय्यद, तरुण 

नेहमीची स्टाइल फॉलो करून फार कंटाळा येतो. दाढीच्या अनेक स्टाइल्स फॉलो करायलाही आवडतात. तरुणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’चा ट्रेंड पाळला जातो. मीसुद्धा दाढी वाढवली आहे. प्रोस्टेट कॅन्सरची जनजागृती म्हणून नोव्हेंबरमध्ये दाढी केली जात नाही. - केतन देवरे, तरुण 

टॅग्स :Puneपुणे