शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
7
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
8
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
9
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
10
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
11
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
12
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
13
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
14
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
15
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
16
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
17
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
19
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे
20
आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!

ST Strike: विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवा; गुणरत्न सदावर्ते यांचे बारामतीतूनचं पवारांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 3:23 PM

बारामती येथील एमआयडीसी आगाराजवळ मागील ४५ दिवसांपासून एसटी कामगारांचे शासकिय सेवेमध्ये विलीनीकरणाचासाठी दुखवटा आंदोलन सुरू आहे.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कामगारांचा शासकिय सेवेतील विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवावा, असे आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी बारामती येथे रविवारी एसटी कामगारांसमोर बोलताना दिले. तसेच तुमच्यासाठी हा संप असला तरी आमच्यासाठी दुखवटा आहे, असेही यावेळी ते म्हणाले.

बारामती येथील एमआयडीसी आगाराजवळ मागील ४५ दिवसांपासून एसटी कामगारांचे शासकिय सेवेमध्ये विलीनीकरणाचासाठी दुखवटा आंदोलन सुरू आहे. एसटी कामगारांच्या या दुखवटा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. 

सदावर्ते पुढे म्हणाले, शरद पवारांनी साखर सम्राट घडवले. त्यांचे ते अराध्य दैवत झाले मात्र त्यांना कामरागांचे कैवारी होता आले नाही. पवारांनी लोकांची दिशाभूल करून पावसात मतांचा जोगवा मागितला. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात कामगारांनी आंदोलन ताणू नये. मात्र ज्याचं जळत त्यालाच कळतं.  मात्र तुम्ही आमचा विलनीकरणाचा लढा दाबू शकत नाही. आम्हाला निलंबनाची, सेवासमाप्तीची भीती वाटत नाही, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले. यावेळी जयश्री पाटील, दशरथ राऊत, काळूराम चौधरी आदी उपस्थित होते.

राज्य शासाकडून उद्या चर्चेचे आमंत्रण

''बारामती येथे बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य शासनावतीने शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून आम्हाला चर्चेसाठी आमंत्रण आले आहे. देसाई यांनी संविधानीक बाबींवर चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी ९ वाजता बोलवले असल्याची माहिती यावेळी सदावर्ते यांनी दिली.'' 

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपGovernmentसरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी