वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्परतेने काम चालू केले, परिसराची पाहणी करुन ४५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने २४ तासांच्या आत विद्युतपुरवठा सुरु केला. यामुळे वेल्हे तालुक्यातील गावे, वाड्या-वस्त्या यांसह परिसरातील कोविड हॉस्पिटल्स यांना दिलासा मिळाला.
कोरोना महामारीच्या काळात महावितरणमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्युतपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी अहोरात्र काम केले. ही बाब कौतुकास्पद आहे. या सर्वांना या कामगिरीबद्दल अभिनंदन करणारे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठविले होते. ते त्यांना शनिवारी दि. ८ मे रोजी वेल्हे सब डिव्हिजन कार्यालय येथे देण्यात आले.
या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष रेणुसे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष किरण राऊत, उपकार्यकारी अभियंता शैलेश गिते, सहायक अभियंता संतोष शिंदे, विठ्ठल भरेकर, कनिष्ठ अभियंता संदीप सोनार, विद्युत कर्मचारी राहुल भुरुख, निलेश शेंडकर, अरुण राऊत, सुनील राऊत, मोतीराम राऊत, शंकर धिंडले, चंद्रकांत कांबळे, नितीन भोईटे, रघुनाथ निवंगुणे, रवी शेंडे आदी उपस्थित होते.