शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

सुसंस्कृत सुप्रियांना ‘ ती ’ भाषा शोभत नाही : विजया रहाटकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 8:35 PM

सुप्रिया सुळेंच्या भाषणाची जी क्लीप ऐकायला मिळत आहे; त्यावरुन तसे बोलणे त्यांना शोभत नाही एवढेच म्हणता येईल...

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे या सुसंस्कृत आहेत. दोनदा त्या खासदार राहिल्या आहेत. मात्र त्यांच्या भाषणाची जी क्लीप ऐकायला मिळत आहे; त्यावरुन तसे बोलणे त्यांना शोभत नाही एवढेच म्हणता येईल, असे मत भाजपाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.  भाजपा शिवसेना महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रहाटकर गुरुवारी (दि. १८) बोलत होत्या. बारामतीमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याला मोबाईल फोनवरुन सुळे यांनी दमबाजी केल्याची कथित ऑडियो क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या संदर्भात त्यांनी मतप्रदर्शन केले.  भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, स्वरदा बापट यावेळी उपस्थित होते. रहाटकर पुढे म्हणाल्या, की महागाई स्थिर ठेवण्यात या सरकारला यश आले. उज्वला गॅस योजनेचा ७ कोटी महिलांना, प्रधानमंत्री आवास योजनेचा २ कोटी महिलांना, शौचालय योजनेचा ९ कोटी महिलांना, मुद्रा योजनेचा १६ कोटी महिलांना आणि सौभाग्य योजनेचा २ कोटी महिलांना लाभ झाला आहे. यापुर्वीच्या सरकारने महिलांसाठी म्हणून कधीही अशा प्रकारचे काम केलेले नाही. देशातील समस्त महिलांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना अंमलात आणणारे मोदी सरकार हे देशातील पहिले सरकार आहे, त्यांच्यामुळेच देशातील २५ कोटी महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून लाभ झाले, त्या सर्व महिला मोदी यांच्याच मागे या निवडणूकीत उभ्या राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी सरकारला जनतेचा पाठिंबा असल्याचे देशातील अनेक राज्यांमध्ये दौरा केल्यानंतर आढळले आहे. निवडणूकीनंतर पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार येईल व मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेVijaya Rahatkarविजया रहाटकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना