उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंनी केली 'ही' घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:59 PM2021-07-21T13:59:03+5:302021-07-21T14:05:17+5:30

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी 'राष्ट्रवादी जीवलग' उपक्रम; 'राष्ट्रवादी सेवादूत' देणार मायेचा आधार

Supriya Sule made this announcement on the occasion of Deputy Chief Minister Ajit Pawar's birthday | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंनी केली 'ही' घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंनी केली 'ही' घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट कडून राष्ट्रवादी जीवलग उपक्रम राबविण्यात येणारराज्यातील ४५० मुलांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याला देण्यात येणार

बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘राष्ट्रवादी जीवलग’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार या माध्यमातून दिला जाणार आहे. 

कोरोनामुळे आई व वडीलांचे छत्र हरपलेले राज्यात जवळपास ४५० ते ४६० बालके आहेत. दोन्ही पालक गमावल्यामुळे या मुलांचे भविष्य अंधकारमय होते की काय, अशी भीती होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने या मुलांचे पालकत्व घेत त्यांना आर्थिक मदत मिळेल, याची तरतूद केली. आर्थिक मदत मिळत असली तरी आपल्या जवळच्या व्यक्तिचे प्रेम, आधार, पाठिंबा, सहकार्य मिळावे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट कडून राष्ट्रवादी जीवलग उपक्रम राबविण्यात येणार असून ४५० 'राष्ट्रवादी सेवा दूत' या माध्यमातून या मुलांचे पालक बनणार आहेत. 

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आई-वडीलांचे प्रेम इतर कुणीही देऊ शकत नाहीत. आता पालकत्व गमावलेली मुले नातेवाईंकाकडे राहत आहेत. या नातेवाईकांची रितसर परवानगी घेऊन, जिल्हा प्रशासनाला याची माहिती देऊन आणि सर्वसमंती नंतरच सदर सेवा दूत त्या कुटुंबाशी आणि मुलाशी जोडला जाईल. या काळात सरकारी योजनांचा लाभ संबंधित मुला-मुलीला मिळवून देणे, शिक्षण, आरोग्य अशा बाबींमध्ये काही अडचण आल्यास मदत करण्याचे काम राष्ट्रवादीचे सेवा दूत करतील. असे त्या म्हणाल्या  आहेत. 

काय आहे उपक्रम...

फेसबुक लाईव्हद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. पालक गमावलेल्या मुलांसाठी सरकार विविध योजना राबवत आहेच. तरीही दैनंदिन जीवनात या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांचे वाढदिवस असतील, शाळेतील पालकांची मीटिंग असेल, खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर जाण्याचे मन करत असेल, अशा कामांमध्ये सरकार लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे 'राष्ट्रवादी सेवा दूत' ही जबाबदारी उचलतील. राज्यातील ४५० मुलांची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्याला देण्यात येणार आहे. वर्षभरात त्या मुलांना काय हवं, नको ते पाहण्याचे काम 'राष्ट्रवादी सेवादूत' करतील.

Web Title: Supriya Sule made this announcement on the occasion of Deputy Chief Minister Ajit Pawar's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.