शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

अजितदादा आठवड्याला कामांचा आढावा घ्यायचे, पण आता कोणी वालीच नाही- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 2:14 PM

दुर्दैवाने तीन महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नाही- सुप्रिया सुळे

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळेेंंना आज पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विविध नागरी समस्यांवर चर्चा केली. वारजे, धायरी, नऱ्हे भागात कचरा आणि पाण्याचे प्रश्न आहेत, त्याचा फॉलो अप घेण्यासाठी आयुक्तांना भेटल्याचे सांगितले. त्यावेळी त्या म्हणाल्या, अजित पवार पालकमंत्री असताना दर आठवड्याला पुण्यातील कामांचा आढावा घेत होते. मात्र आता दुर्दैवाने तीन महिन्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे कामांचा आढावा होत नाहीय.

बारामती विजयसाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी देशाच्या अर्थमंत्री आणि भाजपा नेत्या निर्मला सीतारामण बारामती मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यावर सुळेंना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, माझं आयुष्य सगळं पारदर्शक आहे. मी १३ वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहे. सोशल मीडियावर माझ्या कामाचा आढावा घेतला तर समजेल, देशातील लोक मला फॉलो करतात. मला आनंद होत आहे की, देशाचे अर्थमंत्री बारामतीत येत आहेत. मी त्यांचं स्वागत करते. बारामती लोकसभा मतदार संघात अनेक चांगल्या गोष्टी, संस्था आहेत त्यांना जर खरच वेळ भेटला तर त्यांनी तेथे भेट द्यावी.

नवाब मलिकांकडे दुर्लक्ष? यावर खासदार सुळे म्हणाल्या, नवाब मलिक यांना पक्षाने कधी डावललं नाही, मी रोज त्यांच्या मुलींशी बोलत असते. अजूनही ते आमचे चीफ स्पोक पर्सन आहेत. त्यामुळे नवाब मलिक अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या कुटुंबाची २४ तास माझा कॉन्टॅक्ट असतो.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtraमहाराष्ट्र