भोर (पुणे) : नीरा देवघर डाव्या बंदिस्त कालव्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळेच हे काम झाले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महुडे खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नीरा डावा कालवा बंदिस्त भूमिपूजन व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, नीरा डावा कालवा राष्ट्रवादीने पाठपुरावा करून मंजूर केला आणि कामही झाले. याचा शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होणार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली कामे जनतेसमोर ठेवून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवून भोर, वेल्हेत बदल घडवून आणा. ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी करायची की नाही, हे वरिष्ठ नेते ठरवतील मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीच नंबर वन आहे.
रणजीत शिवतरे म्हणाले, राष्ट्रवादीने मंजूर केलेल्या कर्नावड, कारी, अंगसुळे, लव्हेरी येथील कामांचे भूमिपूजन काँग्रेसने करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. भोलावडे आणि किवत ग्रामपंचायत विरोधात गेल्यामुळे आमदारांनी धास्ती घेतल्याची टीका शिवतरे यांनी केली. तर २० पटापेक्षा कमी असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय होत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद होऊ देणार नाही, असा विश्वास शिवतरे यांनी व्यक्त केला.
विक्रम खुटवड म्हणाले, आम्ही शिष्टाचार पाळतो मात्र विरोधक पाळत नाहीत. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला राजकीय शिष्टाचार शिकवू नये, खा. सुळे यांना विरोध करणाऱ्यांनी स्वत: पहिले आत्मपरीक्षण करावे. योग्य वेळी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, वंदना धुमाळ, रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ, विलास वरे, गणेश खुटवड, लक्ष्मण दिघे, ज्ञानोबा धामुणसे, सुधीर दिघे, देवा मसुरकर, बबन ढवळे, धोंडीबा मालुसरे, भिकोबा कुमकर, आकाश कुमकर, शंकर कडू, संदीप नांगरे उपस्थित होते.