शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
2
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
3
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
4
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
5
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
7
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
8
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
9
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
10
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
11
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
12
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
13
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
14
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
15
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
16
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
17
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
18
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
19
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
20
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा

देशातील 'टॉप-टेन'मध्ये पुणे जिल्ह्यातील दोन खासदार; सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणेंनी मारली बाजी

By विश्वास मोरे | Published: March 24, 2023 3:20 PM

महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत...

पिंपरी : लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे 'गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक' संस्थेमार्फत  सतराव्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण केले. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या 'टॉप-टेन'मध्ये पहिल्या स्थानावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तर दुसऱ्या स्थानावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. १४८ वेळा चर्चेत सहभाग आणि ५०८ प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत.

देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यानुसार सतराव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पहिल्या स्थानावर बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या स्थानांवर श्रीरंग बारणे दुस-या स्थानावर आहेत. शिवसेनेचे श्रीकातं शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.

महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत. भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन असे खासदार पहिल्या दहाच्या यादी आहे. बारणे यांनी आत्तापर्यंत सतराव्या लोकसभेत ५०८ प्रश्न विचारले आहेत. १४८ वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती ९४ टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. सोळाव्या  लोकसभेत देखील कामकाजात खासदार बारणे अग्रभागी होते. सतराव्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेlok sabhaलोकसभा