बाळासाहेब काळे जेजुरी (जि. पुणे) : परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सर्वच नेत्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरे सुुरु केले आहेत़ सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुरंदर तालुक्यात असल्याचे समजताच आधीपासूनच पाहणी दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोपगावजवळ चंद्रकांत पाटील यांचा ताफ ा अडवला़ त्यांना सडक्या फ ळाफु लांचा गुच्छ देऊन नुकसानभरपाईची मागणी केली़
पुरंदर पश्चिम पट्ट्यातील भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली़ याच भागात खासदार सुप्रिया सुळेही पाहणी करत होत्या़डोलणारे हिरवे शिवार क्षणात ओसाड झालेआविष्कार देसाई ।अलिबाग : अवकाळी पावसाने हिरवेगार डोलणारे शिवार आता ओसाड झाले आहे. मुळासकट भाताची चवड अक्षरश: कुजली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकार तुटपुंजी आर्थिक मदत करेलही, पण वर्षभर खाणार काय? गुरा-ढोरांना चारा कोठून आणणार, असा प्रश्न अलिबागमधील शेतकरी चंद्रकांत थळे यांच्यासमोर उभा आहे. थळे यांच्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील भात पिकवणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. हे चित्र जेव्हा त्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना आता काय होणार या विवंचनेतून रडूच कोसळले.