--
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केअर सेंटरमध्ये सुमारे २० रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात येत्या चार दिवसांत कोविड हेल्थ सेंटर सुरू होणार असल्याची माहिती डॉ. दिलीप झेंडे यांनी दिली.
येथील केअर सेंटरमधील रुग्णांवर आयुष डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार करण्यात येत आहेत. सोमवारपासून डेडीकेट कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथील सेंटर ३० बेडचे असून सद्या २० रुग्ण उपचार घेत आहेत. कालपासून सुरू झालेल्या या सेंटरमधील रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपचार करीत असल्याची माहिती डॉ. दिलीप झेंडे यांनी दिली.
या सेंटरमध्ये संशयित तसेच लक्षणे नसणारी मात्र बरे वाटत नसलेल्या रुग्णांवर आयुष डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे या अशा रुग्णांना येथे अटकाव करुन ठेवल्याने इतरत्र प्रसार होण्याचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे याठिकाणी कोविड केअर सेंटरची आवशकता होती. याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत गेल्यास खासगी डॉक्टरांची मदत घेणार असल्याची माहिती झेंडे यांनी दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात चार दिवसांत लवकरच डेडीकेट कोविड हेल्थ सेंटर सुरू होणार आहे. या ठिकाणी रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनबाबतची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून युद्ध पातळीवर रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईन करण्यात येत आहे. तर त्यासाठी लागणारे ऑक्सिजन सिलिंडर दोन दिवसांत येणार असल्याचे डॉ. झेंडे यांनी सांगितले.
--
फोटो १२सुपे कोविड केअर सेंटर सुरू
फोटो -
सुप्यात कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची तपासणी करताना डॉ. झेंडे व परिचारिका.