- नम्रता फडणीसपुणे : पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे खरे आकर्षण असते ते ढोलताशा पथकांचे वादन. कुणाचं वादन सरस ठरतं अशी एक चढाओढच पथकांमध्ये लागलेली असते. गेल्या अनेक वर्षात विसर्जन मिरवणुकीत लक्षवेधक ठरणारं एक पथक म्हणजे समर्थ प्रतिष्ठान. दरवर्षी वादनात नवीन काहीतरी देण्याच्या प्रयोगामुळं पुणेकरांनाही हे पथक कुठल्या मंडळापुढं वादन करणारं याची जणू उत्सुकताच लागलेली असते. यंदा समर्थ प्रतिष्ठान खास पुणेकरांसाठी सुर्डो हे अॅफ्रो ब्राझीलियन वाद्य घेऊन येत आहेत. मानाच्या दुस-या तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीमध्ये पथकातील वादक नऊ ते दहा व्हराईटींवर आधारित ग्लिम्स ऑफ रिदम चे सरप्राईज गणेशभक्तांना देणार आहेत.पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रासह देशविदेशातील भक्तांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. मिरवणुकीत पथकांच्या ढोलताशांचा निनाद अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. रसिकांना वेगळं काहीतरी ऐकायला मिळावे यासाठी समर्थ प्रतिष्ठान दरवर्षी वादनात वेगळी व्हराईटी देण्याचा प्रयत्न करते. यंदाही एक तालवाद्यांची अनोखी मेजवानी ते देणार आहेत. दरवर्षी पथक विविध स्पर्धांमध्ये भाग घेते. सुरूवातीला स्पर्धेमध्ये ज्या नवीन चाली बसविल्या गेल्या. त्या आम्ही वाद्यावर आणून मिरवणुकीत वाजवायला लागलो. लोकांना ते आवडायला लागले. त्यावर्षीपासून सून वेगळं वाद्य आणि ठेका घेऊन आम्ही मिरवणुकीत सहभागी होण्याचा पायंडा पाडला आहे. यंदा आम्ही अँफ्रो-ब्राझीलियन हे वाद्य घेऊन येत आहोत. या वाद्याचे देशी स्टाईलमध्ये आम्ही रूपांतर केले आहे.ह्ण सुर्डोह्ण असे या वाद्याचे नाव आहे. लक्ष्मी रस्त्यावर प्रथमच मिरवणुकीत हे वाद्य सहभागी होत असल्याचे समर्थ प्रतिष्ठानचे वादक गणेश बोज्जी यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, सुर्डो हे ब्राझील संस्कृतीमधील वाद्य आहे. त्यात जेंबे, कॉंगो, बॉंगो असतो. आम्ही सुर्डो ला वेगवेगळ्या पद्धतीने टोन करून ते आपल्या स्टाईलमध्ये उतरविण्याचा प्रयत्न केलाय. यात पहिला हा मायकल जँक्सन चा ट्रँक, उरी चित्रपटातील एक टायटल ट्रँक, जुमानजी मधला एक ट्रँक मग लावणी, पंजाबी, गरबा अशा एकामधून दुस-या तालात आम्ही जातो. म्हणून त्याला ग्लिम्स ऑफ रिदम असं म्हटलं आहे. मी आणि अजिंक्य गायकवाड दोघांनी हे संगीतबद्ध केले आहे. आम्ही या वाद्याबाबत एवढी गुप्तता ठेवली आहे की रोजच्या जागेत त्याचे वादन न करता एका विशिष्ट़य ठिकाणी जाऊन आम्ही या वाद्याचा सराव करतो. पुण्यात पहिलं पथक आहे जे नवीन प्रयोग करते. याशिवाय खास साधु संतांच्या शैलीवर आधारित कुडता आणि धोतर अशी वेशभूषा परिधान करून आम्ही सहभागी होणार आहोत.
मिरवणुकीत दणाणणार "सुर्डो -अॅफ्रो" ब्राझीलियन वाद्याचा ठेका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 3:09 PM
सुर्डो हे ब्राझील संस्कृतीमधील वाद्य आहे. त्यात जेंबे, कॉंगो, बॉंगो असतो..
ठळक मुद्दे समर्थ प्रतिष्ठान पुणेकरांना देणार ग्लिम्स ऑफ रिदम चे सरप्राईज