पुणे : माओवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांनी सायबर लॉचे शिक्षण घेण्यासाठी केलेला अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी नाकारला.सायबर कायद्याच्या शिक्षणासाठी परवानगी दिल्यास कारागृहातील वायफाय हॅक होऊ शकते. येथील डेटा चोरीला जाऊ शकतो. तसेच शिक्षण घेण्याच्या बहाण्याने आतापर्यंत हाती न आलेला डेडा डिलीट करण्याची शक्यता आहे, असे आदेशात नमूद करण्यात होते. गडलिंग यांनी मुक्त विद्यापीठातून सायबर लॉची पदविकेचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, कारागृह प्रशासनाने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे नमूद केले होते. कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहामध्ये कला आणि वाणिज्यची पदवी घेण्याची सुविधा असून सायबर लॉची पदविका करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे म्हणणे मांडले.सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी त्यांच्या सायबर लॉचे शिक्षण घेण्याला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने पदविकेची सुविधा कारागृहात उपलब्ध नाही. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्य इंटरनेटची सुविधा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी नाकारली.पत्नी व मुलांचे पत्र मिळाले नाहीगडलिंग यांनी गरम कपडे, हातमोजे आणि वही आणि कलर पेन्सिलची मागणी केली. मात्र, पेन्सिल आणि वही देण्यास काही हरकत नसून गरम कपडे आणि हातमोजे कारागृह प्रशासनाला विचारून द्यावे लागेल, असा आक्षेप अॅड. उज्ज्वला पवार यांनी घेतला. पत्नीने आणि मुलाने पाठविलेली पत्रे कारागृह अधिकाऱ्यांनी मला न देता ती परत पाठविल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. कारागृह प्रशासनाने असे का केले, असा प्रश्न गडलिंग यांनी उपस्थित केला.
सुरेंद्र गडलिंग यांना सायबर लॉचे शिक्षण नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 3:09 AM