शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात कवठे येमाई, संविदने, मलठण, जांबुत, पिंपरखेड परिसरात मोठ्या प्रमणात वाळूतस्करी सुरु असल्याबाबतचे वृत्त लोकमतने दिले होते. त्यानंतर प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरच्या तहसीलदार यांनी कवठे येमाईपाठोपाठ संविदणे येथे कारवाई केली. बारामती
याबाबत तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले की संविदणे येथे वाळु तस्करी सुरु असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या . मात्र तस्करांची लागेबांधी तसेच तहसीलदार यांच्या प्रत्येक हालचालीवर तस्करांची नजर होती. त्यामुळे कारवाई करण्यास मोठी अडचण येत होती .
मात्र तहसीलदार लैला शेख यांनी तस्करांच्या लोकेशनला गुंगारा देत थेट संविदणे गावात मध्यरात्री ओढ्यांच्या घनदाट जंगल परीसरात धाडसी कारवाई केली . मात्र पथक दाखल झाल्यांचे समजताच काही जेसीबी, चार वाळूच्या ट्रक व ट्रक्टर सह तस्करांनी तेथुन पलायन केले . मात्र पोकलॅन्ड मशिन पळवता न आल्याने महसुल पथकाला सापडले . संविदने येथे गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमानात वाळु तस्करी सुरु होती . मात्र याकडे तलाठी यांनी का दुर्लक्ष केले असा सवाल जनतेमधून केला जात आहे. या कारवाईमध्ये मंडल अधिकारी यु एन फुंदे, तिर्थगिरी गोसावी तलाठी के एम जाधव, सुशिला गायकवाड ,एस. बी. शिंदे, दशरथ रोडे यांनी सहभाग घेतला.
चौकट
एक महीला तहशिलदार असुन सुद्धा स्वतः पुढाकार घेत रात्री अपरात्री वाळुच्या ठिकानी असलेल्या निरमनुष्य परीसरात जाऊन तहसीलदार लैला शेख या विना पोलिस संरक्षणात जिवाची पर्वा न करता वाळु तस्कराची अड्डे उध्वस्त करीत असल्यांने तालुक्यातील तस्करांनी त्यांचा धसका घेतला तर जनते मधुन मात्र कौतुक होत आहे .