पुणे : केशरचंद गुलाबचंद संस्थेचे संस्थापक हस्तीमल मुनोत यांना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा ‘सूर्यगौरव समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला.
हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते मुनोत यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना पोपटराव पवार म्हणाले, ʻहस्तीमलजी यांनी शिक्षण, वित्त, उद्योग, समाजकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. एवढी वर्षे त्यांच्या हातून झालेले विधायक कार्य हे निश्चितच दिशा देणारे व प्रेरक आहे. त्यांच्या या कार्याने मागील पिढीतील सर्वाना आत्मविश्वास व प्रेरणा तर दिलीच; पण भविष्यातही पुढे कित्येक पिढ्यासाठी एक मानदंड घालून दिला आहे.ʼ
डॉ. चोरडिया म्हणाले, समाजाच्या सेवेत मुनोत यांनी जीवन समर्पित केले आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना आनंद होत आहे.ʼ
--------------------
Photo Caption:
(फोटो जेएमएडीट वर)
हस्तीमल मुनोत यांना पुरस्कार प्रदान करताना डावीकडून किशोर मुनोत, डॉ. संजय चोरडिया व पोपटराव पवार.