शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

‘सूर्यदत्त जीवनगौरव २०१८ पुरस्कार’ जाहीर; ‘सूर्यदत्त’च्या विसाव्या स्थापनादिनी रंगणार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:59 AM

‘सूर्यदत्त ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट’च्या वतीने सलग गेली १५ वर्षे दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार देण्याचे यंदाचे १६ वे वर्ष आहे.

ठळक मुद्देबावधन येथील प्रांगणात बुधवार (दि.७) रोजी सायंकाळी ५ वाजता होईल सोहळासुधांशूजी महाराज असणार हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते

पुणे : ‘सूर्यदत्त ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट’च्या वतीने सलग गेली १५ वर्षे दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले. हे पुरस्कार देण्याचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. सूर्यदत्त संस्थेत शिकविल्या जाणाऱ्या फॅशन डिझाइन, इंटेरिअर डिझाइन, ब्युटी आणि वेलनेस, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, स्पोर्ट्स आणि फिटनेस, बिझनेस मॅनेजमेंट, हेल्थ सायन्स, सोशल सायन्स, पब्लिक सर्व्हिस, सायन्स आणि टेक्नोलॉजी, ब्रेव्हरी इत्यादी क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींना सूर्यदत्त जीवनगौरव तसेच सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार संस्थेच्या वतीने प्रदान केले जातात.  सूर्यदत्त ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, की विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी केलेल्या तज्ज्ञांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी व शिक्षक आपल्या यशासाठी ध्येय व उद्दिष्ट निश्चित करू शकतील. संस्थेतील विविध अभ्यासक्रमांचे प्रमुख विषय विचारांत घेऊन त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ ह्या यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व त्यामुळे भारताच्या नवनिर्मितीसाठी नवयुवकांचा हातभार लागेल. सूर्यदत्तच्या विसाव्या स्थापनादिनी होणारा हा पुरस्कार सोहळा सूर्यदत्त ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या पाटीलनगर, बावधन येथील प्रांगणात बुधवार (दि.७) रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिर राहणार आहे. सुधांशूजी महाराज हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असणार आहेत.  

सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार २०१८ सुधांशूजी महाराज (आधुनिक भारताचे संत)कै. हिराभाई शाह (समाजभूषण - कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) रामदास फुटाणे (वाङ्मय आणि काव्य)मुकेश खन्ना (दूरदर्शन कलावंत)गोविंद नामदेव (भारतीय सिनेसृष्टीतील चरित्र अभिनेता)डॉ. कल्याण गंगवाल (समाजात शांतता आणि एकोपा राखण्यासाठी केलेले कार्य तसेच महत्त्वपूर्ण योगदान)सुनील पारेख (प्रेरणादायी प्रशिक्षण)मुरली लाहोटी (संकल्पित कला)

सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०१८ भानुप्रताप बर्गे (शौर्य)अशोक शिलवंत (सामाजिक कार्य)डॉ. जयश्री तोडकर (वैद्यकीय शास्त्रातील संशोधन)पोपटराव पवार (ग्रामीण सुधारणा)डॉ. अविनाश पोळ (वैद्यकीय सामाजिक सेवा)उस्ताद इर्शाद खान (भारतीय शास्त्रीय संगीत आणि वादन)ग्रेसी सिंग (हिंदी चित्रपट नायिका)टेरेन्स लेविस (नृत्य आणि कला दिग्दर्शन)मृणाल कुलकर्णी (अभिनय, दिग्दर्शन आणि सिनेकलावंत)श्वेता जुमानी (संख्याशास्त्र)अ‍ॅड. हितेश जैन (कायदा आणि सुव्यवस्था)ललिता बाबर (क्रीडा)डॉ. गंगाधर मम्हाणे (शैक्षणिक सामाजिक कार्य)

सूर्यदत्त युवा पुरस्कार २०१८ प्रांजल जैन गुंदेशा (उद्योजकता आणि शालेय शिक्षणातील नावीन्यपूर्णता)पार्थ बन्सल (विज्ञान आणि तंत्रज्ञान)

टॅग्स :Puneपुणे