बोपगाव ग्रामपंचायतीने यावर्षी पहिल्यांदाच सर्वच्या सर्व महिला सदस्य निवडून दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत बिनविरोध करून व एक नवीन पायंडा पाडला आहे.
बोपगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्य म्हणून शालन अर्जुन फडतरे, हर्षदा काळुराम पवार, प्रियांका शामराव फडतरे. सुवर्णा मधुकर जगदाळे, स्वाती दिनकर फडतरे, ज्योती कुंडलिक फडतरे, संजीवनी मस्कू फडतरे यांची नियुक्ती झाली आहे. यावेळी प्रकाश भाऊ फडतरे, बाजीराव जगदाळे, दयानंद फडतरे, योगेश फडतरे, संदीप फडतरे, शांताराम जगदाळे, कानिफनाथ फडतरे, विनायक गुरव, साहेबराव फडतरे, अनंत फडतरे, बाप्पू फडतरे, विनायक गायकवाड, दादा जगदाळे, मधुकर जगदाळे, राम फडतरे, महादेव फडतरे, बाळासाहेब काळाणे, एकनाथ फडतरे, दादा फडतरे हे उपस्थित होते.
गावातील ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने विविध शासकीय योजना राबवून बोपगावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सरपंच सुषमा फडतरे व उपसरपंच सारिका गुरव यांनी सांगितले.
फोटो : बोपगाव (ता. पुरंदर) ग्रामपंचायत सरपंचपदी सुषमा फडतरे व उपसरपंच सारिका गुरव.