पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:44 PM2024-05-24T16:44:30+5:302024-05-24T16:45:44+5:30

आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार

suspend investigating police constables Otherwise the video will be tweeted in 48 hours ravindra dhangekar warning | पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा

पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने निष्पाप दोघांना जीव गमवावा लागला. ही घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, तर दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला होता. त्यावरून पुणेपोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले. आमदार रवींद्र धंगेकर यांनीसुद्धा पुणे पोलिसांच्या अक्षम्य चुका काढत आरोप केले आहेत. 

आता धंगेकरांनी नवीन ट्विट करत पुणे पोलिसांना इशारा दिला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमधील फोटोत वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत. त्यावरून धंगेकरांनी, पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील असा इशारा दिला आहे. 

धंगेकर ट्विट करत म्हणाले, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे. मुंढवा पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब , हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात असा आरोपही त्यांनी केला आहे. 

धंगेकरांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेले आरोप 

१)इतक्या गंभीर प्रकरणात पहिली F.I.R दाखल करताना अक्षम्य अश्या चुका करण्यात आल्या आहेत,ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो.
आरोपीने स्वतः सांगतोय मी दारू पिऊन गाडी चालवली तरी देखील कलम १८५ लपवण्यात आले.तसाच प्रकार ३०४ कलम मध्ये सुद्धा केला.हे कलम जर अगोदर लावले असते तर परवाच त्याचा जामीन नाकारला असता व व्यवस्थेची इतकी बदनामी झाली नसती.

२)कुठल्याही अपघातात त्या कार मधील इतर व्यक्तींची चौकशी केली जाते. या प्रकरणात इतर २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले आहे.FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही. अर्थात यासाठी त्या मुलांचा पालकांकडून वेगळी डिल झाली आहे.

३) राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिल्या FIR पासून ३०४ कलम होता हे ठासून सांगितले प्रत्यक्षात पहिल्या FIR मध्ये त्याचा उल्लेख देखील नाही ,याचाच अर्थ पोलीस कमिश्नर यांनी गृहमंत्र्यांची देखील दिशाभूल केली आहे.

४) आज या घटनेचा ५ वा दिवस आहे.या घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले.सर्व व्यवस्थेची बदनामी झाली परंतु तरी देखील अद्याप कोणीही अधिकारी यात निलंबित नाही.याचा अर्थ तपास अधिकाऱ्या पासून ते कमिश्नर पर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे.

५) काल अचानकपणे पुणे शहरातील ४ ते ५ पब आणि रूफटॉप रेस्टॉरंट वर कारवाई करण्यात आली. जर हे सर्व अवैद्य होतं तर ही घटना घडण्याची वाट का पाहिली..? पोलीस कमिशनर इतक्या दिवस त्यांच्या पाकिटावर मेहरबान होऊन त्यांना पब चालविण्याची मुभा देत होते का..?
 

Web Title: suspend investigating police constables Otherwise the video will be tweeted in 48 hours ravindra dhangekar warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.