बारामती : नगरपालिका प्रशासनाच्या वतीने विसर्जनासाठी जमा केलेल्या गणेशमूर्ती कचरा डेपोतील खड्ड्यात विल्हेवाट लावण्यासाठी आणल्याच्या प्रकरणात आता विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली आहे. याबाबत परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजाभाऊ चौधरी यांनी गुन्हा दाखल असलेल्या पदाधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच गुन्हा दाखल झालेल्या संस्थेचे ‘रजिस्ट्रेशन’ रद्द करावे, अशी मागणी केली आहे.
चौधरी यांनी सोमवारी (दि. १) पत्रकारांशी बोलताना याबाबत मागणी केली. ते म्हणाले, हिंदू देवदेवतांचे विटंबन होऊ नये. आम्ही या घटनेचा लोकशाही मार्गाने जाहीर निषेध करीत आहोत. गणपती विसर्जन करण्याची व्यवस्था नव्हती तर विसर्जनाचे आवाहन करायचे नव्हते. शहरातील नागरकिांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये. गणरायाची अवकृपा बारामतीकरांवर होऊ नये म्हणून बारामतीमध्ये गणेशयाग व एक दिवसाचा उपवास करण्याचे आयोजित केले आहे. दान केलेल्या गणपती मूर्तींचे विसर्जन विध्ािवत करण्यात यावे, यासाठी पोलीस प्रशासन, बारामती नगरपालिके कडे गणेशमूर्ती सुपूर्द करुन शहरातील नागरिक, सर्व गणपती मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमवेत विधिवत विसर्जन करण्यात येईल. दरम्यान, शहरातील काही गणेश मंडळांची सायंकाळी कसबा येथील शिवाजी उद्यानात बैठक पार पडली. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. याबाबत माहिती देण्यासाठी शहर पोलीस निरीक्षक अशोेक धुमाळ यांच्या दालनात गणेश मंडळाची रात्री बैठक पार पडली. या वेळी नगरसेवक सुनील सस्ते, प्रशांत सातव, नीलेश धालपे, सुरेंद्र जेवरे आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गुन्हा दाखल असलेल्या बारामती एन्व्हायर्नमेंटल फोरम आॅफ इंडियाच्या पदाधिकाºयांसह मुख्याधिकारी योगेश कडुसकर, सुभाष नारखेडे यांच्यावर पोलिसांनी अटक कारवाई करावी. कारवाई होईपर्यंत गणेश विसर्जन करण्यात येणार नाही,असा इशारा या वेळी सातव यांनी दिला. तर पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी वरिष्ठांशी बोलून याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले.पाच जणांवर गुन्हाया प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भाजपा नेते प्रशांत सातव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, कर्मचारी बाळू जगन्नाथ कबीर, उमेश देविदास भिंगे, नगरपरिषदेचे वरष्ठि अधिकारी व एन्व्हार्र्नमेंटल फोरम आॅफ इंडयिा या संस्थेसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.पोलीस प्रशासन नेमकी कोणावर कारवाई करणार?या प्रकरणी बारामती नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाºयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाºयाचा संदर्भ पोलिसांनी स्पष्ट केला नाही. थेट अधिकाºयाचे नाव घेऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. एन्व्हायर्नमेंटल फोरम आॅफ इंडियाबाबत देखील हीच भूमिका पोलसिांनी घेतली आहे. नगराध्यक्षा, काही नगरसेवक देखील फोरमचे सदस्य आहेत. त्यामुळे या प्रकरणाला महत्त्व आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आता कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी (दि. ३०) गुन्हा दाखल झाल्यानंतर फोरम आरोपी नाही, त्यामुळे फोरमवर गुन्हा दाखल होण्याचा प्रश्नच नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगणारे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश अपसुंदे यांनी सोमवारी मात्र, त्यांची भूमिका बदलली. आपण असे बोललोच नाही, असा दावा अपसुंदे यांनी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत केला.