शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

आरटीओतील निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत : राज्य सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 12:51 PM

परिवहन विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत राज्यातील २८ मोटर वाहन निरीक्षक आणि ९ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दोषी आढळले.

ठळक मुद्देपुणे कार्यालयात सहा अधिकारी होणार रुजूसंबंधित अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून पुन्हा सेवेत रुजु करण्याचे परिपत्रक

पुणे : नियमानुसार वाहन तपासणी न करणाºया राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील ३७ अधिकाºयांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश राज्य सरकाच्या गृह विभागाने काढले आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) ३ मोटार वाहन निरीक्षक आणि ३ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मिळणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने वाहन योग्यता प्रमाणपत्र देताना काटेकोरपणे नियम पाळण्याचे आदेश दिले होते. परिवहन विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत राज्यातील २८ मोटर वाहन निरीक्षक आणि ९ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दोषी आढळले. यवतमाळ, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, पनवेल अणि ठाणे या परिवहन कार्यालयातील हे अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांना निलंबित केल्यामुळे, मनुष्यबळा अभावी आरटीओतील कामकाज विस्कळीत झाले होते. राज्य सरकारच्या २० एप्रिल २०१३च्या परिपत्रकानुसार संबंधित अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून पुन्हा सेवेत रुजु करुन घेण्यात येत असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे. त्यामुळे आरटीओतील कामकाज सुरळीत होण्यास काहीशी मदत होणार असल्याचे आरटीओतील अधिकाºयांनी सांगितले. पुणे आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकपदी योगिता अत्तरदे, ललित देसले, सुरेश आवाड यांची, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी राजकुमार मोरमारे, प्रदीप ननवरे आणि रवींद्र राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुर, बोरीवलीत प्रत्येकी २ , बीड, पेण, लातूर, कल्याण, अहमदनगर, श्रीरामपूर, रत्नागिरी, वसई, अंबाजोगाई प्रत्येकी १, ठाणे ४, मुंबई मध्य २ आणि मुंबई पूर्व १, नाशिक ३  आणि मोटार वाहन निरीक्षक रुजु होतील. ठाणे येथे २, मुंबई पूर्व आणि पश्चिम प्रत्येकी १, बोरीवली आणि नागपूर पूर्वमधे प्रत्येकी १ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रुजू होतील. 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसsuspensionनिलंबनState Governmentराज्य सरकार