शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

फार्महाऊसवरील 'डान्स पार्टी' भोवली; पुणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 7:46 PM

राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत फार्महाऊसवर केलेल्या 'डान्स पार्टी'ची दखल

ठळक मुद्देठेकेदारांच्या कामांची होणार तपासणी : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली गांभीर्याने दखल 

पुणे :  राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून बारगर्ल आणत त्यांच्यासोबत फार्महाऊसवर केलेल्या 'डान्स पार्टी'ची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. या पार्टीचे आयोजन करून बाराबालांसोबत थिरकणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. 

तसेच पार्टीतील सहभागी ठेकेदारांनी केलेल्या कामांची गुणवत्ता तसेच प्रत्यक्षात कामे झाली आहेत की नाही याची दक्षता समितीमार्फत बारकाईने तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. कुडजे गावातील लबडे फार्महाऊसवर पालिकेतील 'रिंग मास्टर' ठेकेदार आणि एक अधिकारी पोलिसांच्या छाप्यात पकडले गेले. पोलिसांनी मंगेश राजेंद्र शहाणे (वय ३२, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपुत (वय २५),  निखील सुनिल पवार (वय ३३, रा.  पर्वती दर्शन), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय ३९, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (वय ४२, रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (वय २६, रा. मिलिंदनगर, सांताक्रुझ, मुंबई),  निलेश उत्तमराव बोधले (वय २९, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी),  सुजित किरण आंबवले (वय ३४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (वय २४, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) यांना अटक केली. तर, फार्म हाऊस व्यवस्थापक पायगुडे, पार्टीचे आयोजन करणारा अधिकारी विवेकानंद बडे आणि डान्सर मुलींना घेऊन येणारी प्राजक्ता जाधव यांना न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींची जामीनावर सुटका केली आहे.

अटक झालेल्यांपैकी बहुतांश जण हे पुणे महापालिकेतील ठेकेदार आहेत. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, विवेकानंद बडे हा पालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता आहे. या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. बडे आणि ठेकेदारांमध्ये नेमके काय संबंध आहेत, त्यांनी ठेकेदारांची बिले देण्यास मदत केली आहे काय याचीही चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले.----अभियंता विनायक बडे याला निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार गंभीर आहे. पकडले गेलेले ठेकेदार आणि बडे यांच्यातील संबंध नेमके काय आहेत हे तपासण्यात येणार आहे. बडे याची विभागीय चौकशी केली जाणार आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामांची देखील तपासणी केली जाणार आहे. ही कामे खरोखरीच झाली आहेत का, झालेल्या कामांची तपासणी कोणी केली होती, कोणत्या अधिकाऱ्यांनी सह्या दिल्या होत्या हे सर्व बारकाईने तपासले जाणार आहे.- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका

टॅग्स :Puneपुणेdanceनृत्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाsuspensionनिलंबनPoliceपोलिस