शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

गोवर-रुबेला लसीबाबत संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:26 AM

पालकांचा नकार : ४० मुस्लिम शाळांमधील १४ हजार विद्यार्थी

- सुषमा नेहरकर-शिंदे 

पुणे : रुबेला लस हिंदू को अलग और मुस्लिम को अलग दे रहे है, असे सांगत पुणे शहरातील कोंढवा, हडपसर, मिठानगर, रामटेकडी, सय्यदनगर आदी भागातील सुमारे ४० महापालिका व खासगी मुस्लिम शाळांमधील तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांना रुबेला लस देण्यास पालकांनी नकार दिला आहे. पालकांना रुबेला लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासनाकडून अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतरदेखील आपल्या पाल्यांना लस देण्यास पालकांनी नकार दिला आहे. यामुळे महापालिका प्रशासनासमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला असून, थेट आयुक्तांनी मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींची बैठक मंगळवारी घेतली. मात्र, तरीही पालकांची समजूत पटू शकली नाही.

रुबेला लसीकरणामुळे मुलांना त्रास होता, ताप येतो म्हणून लस न देणाऱ्या पालकांची संख्यादेखील मोठी होती. परंतु शाळा, प्रशासन, डॉक्टरांमार्फत अशा सर्व पालकांचे समुपदेशन करून अशा सर्व विद्यार्थ्यांना लस देण्यास प्रशासनाला यश आले आहे. शहरामध्ये २७ नोव्हेंबर २०१८ पासून गोवर रुबेल लसीकरण मोहीम सुरू आहे. शहरातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पुणे शहरातील कोंढवा, हडपसर, मिठानगर, रामटेकडी, सय्यदनगर या परिसरातील महापालिका आणि खासगी मुस्लिम शाळांमधील मुला-मुलीच्या गोवर रुबेला लसीकरणासाठी प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याबाबत आरोग्य विभागाच्यावतीने पालकांच्या अनेक बैठका घेण्यात आल्या. परंतु बैठकीत मुलांना त्रास होईल, म्हणून नाही तर मोदी सरकारच्या या मोहिमेबद्दल संशय असल्याने आम्ही मुलांना ही लस देणार नसल्याचे सांगितले. याबाबत प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधी, मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचीदेखील मदत घेतली आहे. परंतु अद्यापही पालक लसीकरण करून घेण्यास तयार नाहीत.

गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाने विविध पातळीवर ही मोहीम यशस्वी करण्याठी अनेक प्रयत्न केले आहेत. यामुळे आतापर्यंत शहरातील साडेसहा लाख बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.लसीकरण पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी होती, परंतु अद्यापही २० ते २५ टक्के मुलांचे लसीकरण शिल्लक असल्याने या मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली असून, आता २५ जानेवारी २०१९ अखेरपर्यंत शंभर टक्के मुलांना ही लस देणे आवश्यक आहे.