ओतूर : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डुंबरवाडी मे २०२१ च्या वार्षिक परीक्षा कोविडच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने जुलै २०२१ मध्ये घेण्यात आल्या होत्या, त्यांचा वर्षानुसार निकाल व तीन पहिले क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेमध्ये बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील ओमकार ढगे याने ८८.७९ टक्के - प्रथम, अश्विनी वारे-८८.०८ व्दितीय, सुजाता ठोकळ - ८६.०८ टक्के -तृतीय. डी फार्मसी व्दितीय वर्ष विभाग : काजल बबन घाडगे- ९०.४० टक्के (प्रथम), संजना खंबळकर ९०१.१०टक्के (व्दितीय), शनि पांडे ९० टक्के. (तृतीय). डी फार्मसी (प्रथम वर्ष) रोहिणी लखंबरे ९२.५५ टक्के (प्रथम), वेदांत घोलप (८८.०९), हरीश बिरादार८४.१८ टक्के (तृतीय). संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे, मानद सचिव वैभव तांबे, प्राचार्य डॉ. गणेश दामा यांनी यशस्वितांचे अभिनंदन केले.
--
१३ ओतूर डुंबरवाडी
डुंबरवाडी फार्मसी कॉलेज
सोबत फोटो मेल केला आहे