शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

आवाजाच्या दुप्पट वेगाने उडणार स्वदेशी तेजस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:10 AM

निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मंजुरी दिली. राफेल ...

निनाद देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने बुधवारी मंजुरी दिली. राफेल पाठोपाठ हवाई दलात तेजस विमाने दाखल होणार असल्याने हवाई दलाच्या ताकदीत आणखी वाढ होणार आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर या खरेदीच्या मंजुरीला महत्त्व आहे. हवाई ताकद वाढण्याबरोबरच स्वदेशी विमान तंज्ञनाला येत्या काळात चालना मिळणार असून, देशाच्या आत्मनिर्भर योजनेला यामुळे मोठे बळ मिळणारा आहे. आवाजाच्या दुप्पट वेगाने उडण्याची क्षमता तेजस मध्ये आहे.

बहुप्रतीक्षित तेजस या हलक्या लढाऊ विमानाची भारतीय हवाई दलाला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गेल्या ३० वर्षांपासून तेजस विमानावर संशोधन सुरू होते. मिग विमानांचे सातत्याने अपघात होत असल्याने तसेच १९९० नंतर ही विमाने सेवेतून निवृत्त होण्याच्या शक्‍यतेमुळे त्यांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलात नव्या हलक्‍या लढाऊ विमानांची गरज निर्माण झाली होती. या सोबतच परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने हे विमान तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

सुरुवातीच्या टप्प्यात विमान निर्मितीसाठी ५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर हा खर्च वाढत गेला. १९९३ मध्ये सरकारने या प्रकल्पासाठी २ हजार १८८ कोटी मंजूर केल्यानंतर विमान निर्मितीला वेग आला.

तेजस विमानांचे फायनल ऑपरेशनल क्लिअरन्स (उड्डाणाचा अंतिम परवाना) २०१९ ला एअरो इंडिया या विमानांच्या प्रदर्शनात मिळाला होता. या परवान्याचा अर्थ हवाई दलाला गरजेच्या असलेल्या सर्व तांत्रिक पूर्तता या विमानात पूर्ण झाल्या असून ते उड्डाणास योग्य असल्याचा हवाला त्रयस्थ यंत्रणेने दिला होता.

चौकट

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवलेले तेजस हे पहिले भारतीय लढाऊ विमान ठरेल. हे विमान ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के ॲल्युमिनियम आणि टिटॅनियम या धातूपासून बनविलेले आहे. तेजस विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते. विमानात जहाजविरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेटसह अत्याधुनिक उपकरणे डागण्यास सक्षम आहे.

रिकाम्या विमानाचे वजन ५६८० किलो असून ९ हजार किलोचे वजन वाहून नेऊ शकते. कमी उंचीवरून शत्रूच्या तळांचा अचूक भेद करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे. ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट वेगाने उडणाऱ्या तेजसची लांबी १३.२ मीटर आणि उंची ४.४ मीटर आहे.

चौकट

- तेजस मिग २१ विमानांपेक्षाही आधुनिक असून हे चवथ्या पिढीचे विमान आहे.

- इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ॲरे (एईएसए), दृष्टीपलीकडील पल्ल्याचे क्षेपणास्त्र (बीव्हीआर), इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रज्ञानयुक्त तसेच इस्राईल निर्मित आधुनिक रडार. हवेत इंधन भरण्याची सुविधा

- ८३ विमाने असणारे मार्क १ ए प्रकारची, भविष्यातील मार्क २ विमानांवरही संशोधन सुरू