पुणे : महाराष्ट्राचा जय जयकार करणारे, शिवरायांच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या आठवणी जागविणारे पोवाडे... डफावर पडणारी थाप आणि शाहिरांचा भारदस्त आवाज अशी चैतन्यदायी संध्याकाळ पुणेकरांनी अनुभवली.निमित्त होते, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या राज्यस्तरीय शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे. कोल्हापूरचे युवा शाहीर आझाद नायकवडी यांना हा पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमास महाराष्ट्र शाहीर परिषद विदर्भ प्रमुख कार्यवाह भीमराव बावनकुळे, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर दादा पासलकर, तारासिंह गोरोवाडा, अंबादास तावरे, शिवाजी पाटील, शामराव खडके, प्रबोधिनीचे सचिव माधवसिंह परदेशी, सहसचिव महादेव जाधव, शाहीर संगीता मावळे, रूपाली मावळे आदी उपस्थित होते.पुरस्काराला उत्तर देताना आझाद नायकवडी यांनी पोवाडे सादर केले. संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले. रूपाली मावळे यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पोवाड्यातून स्वराज्याच्या स्मृती
By admin | Published: October 05, 2015 1:32 AM