पुणे: दरवर्षी दिवाळीमध्ये आवाज आणि हवेचे प्रदूषण उच्चांकी पातळी गाठते. यंदा हे प्रमाण ठराविक लक्ष्मी पूजनाच्या दिवसापुरते नोंदले गेले. लक्ष्मीपूजनालाच सर्वाधिक फटाके वाजविल्यामुळे त्या दिवशी आवाजाची पातळी अडीचशे डेसीबलच्या वर पोचले होते. जे आरोग्यासाठी अत्यंत घातक होते आणि त्यामुळे केवळ मानवी नव्हे तर त्याचा धोका पशू, पक्ष्यांनाही झाला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या दिवाळी सणासाठी शहरात काही ठिकाणी ध्वनी निरीक्षण केले. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही काही ठिकाणे निवडली होती. यावेळी तीन दिवस म्हणजे दिवाळीपूर्वीचा एक दिवस, दुसरा लक्ष्मीपूजनाचा आणि तिसरा पाडव्याचा दिवस ठरविण्यात आला होता. यामध्ये सर्वाधिक आवाज लक्ष्मीपूजनाला झाला.
फटाक्यांच्या आवाजामध्ये शहरातील स्वारगेट, शनिवारवाडा, येरवडा, सारसबाग आणि लक्ष्मी रोड येथे सर्वाधिक डेसिबलची नोंद झाली.
यंदा आम्ही शहरातील अकरा ठिकाणांवर प्रदूषण नियंत्रणासाठी नियोजन केले होते. त्यामध्ये हवेचे आणि आवाजाचे निरीक्षण करण्यात आले. त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सर्वाधिक आवाज आणि हवेचे प्रदूषण नोंदले गेले. यंदा फटाक्यांची दिवाळीपूर्वी तपासणी करून त्याची पातळी धोकादायक नाही ना हे पाहिले होते.- नितीन शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे
शहरातील प्रदूषणाची पातळी
ठिकाण -१० नोव्हें. - ११ नोव्हें. - १२ नोव्हें.१) जगताप डेअरी - ५८ - ७१ - २६४
२) डांगे चौक -६५ -७४ - २५९३) कात्रज डेअरी - ६३ -४६ -११४
४) पुणे रोझ गार्डन - ५६ -६४ - २४७५) पुणे विद्यापीठ - ५४ - ७८ -१६८
परिणाम काय? - ठीक - ठीक - अत्यंत घातक
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा आवाज (डेसीबल)
१) शिवाजीनगर - ८३
२) कर्वे रोड - ८८.६३) सातारा रोड - ८८.७
४) स्वारगेट - ९२५) येरवडा - ८९.१
६)खडकी - ८७.१७) शनिवारवाडा - ९०.५
८) लक्ष्मी रोड - ९०.७९) सारसबाग - ८८.७
१०) औंध गाव - ८६.५११) विद्यापीठ रोड - ८३.३
किती डेसिबल योग्य ?
सर्वसाधारणपणे शांतता क्षेत्रात ४५ डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल्स आवाजाची पातळी ठरवून दिलेली आहे. परंतु, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही पातळी दुप्पट झाली.
पशू-पक्ष्यांना त्रास
फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने अनेक घरांच्या खिडक्या, तावदाने हलत होती. तसेच घरातील मांजर, श्वान घाबरून इकडेतिकडे पळत होती. पक्ष्यांनाही याचा त्रास झाल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले. काही जणांनी आपल्या घरातील मांजर, श्वानांना बंद खोलीत ठेवले. त्यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून बरेच उपाय केले तरी देखील आवाजच खूप होते.